R Ashwin Retirement: गंभीरसोबत वाद झाल्यानेच अश्विननं टीम इंडिया सोडली? व्हायरल फोटोवरून सोशल मीडियावर चर्चा

R Ashwin : भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज आर अश्विनची निवृत्तीचा विषय सध्या चर्चेत आहे. त्यांच्या निवृत्तीबाबत अनेक प्रकारचे वाद सुरू आहेत.
R Ashwin
R Ashwin RetirementMoney Control
Published On

भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याच्या निर्णयाने अनेक चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलंय. दरम्यान आस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नाथन लॉयन याला ही त्याच्या निवृत्तीचं आश्चर्य वाटलंय. लॉयन म्हणाले, आर अश्विन हा भारतीय संघातील सर्वात चांगला खेळाडू होता.

न्यूझीलंड कसोटी मालिका सोडली तर त्याआधी तो बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत त्याला प्लेयर ऑफ द सीरीज निवडण्यात आले होते. त्यामुळेच त्याने अचानक घेतलेल्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. अश्विनने केलेल्या निवृत्तीच्या या घोषणेनंतर त्याच्या निवृत्तीमागे काही मोठे कारण असावे असं म्हटलं जात आहे. अशीच चर्चा सुरू असतानाच सोशल मीडियावर त्याया एक फोटो व्हायरल होतोय.

यात तो प्रशिक्षक गौतम गंभीरसोबत बोलताना दिसत आहे. मात्र अश्विन हे चांगल्या मनस्थितीत नव्हते. त्या दोघांमध्ये काहीतरी वाद झाला असावा असा अंदाज नेटकरी लावत आहेत. निवृत्तीच्या घोषणेपूर्वी अश्विनची आणि गंभीरची ब्रिस्बेनमध्ये भांडण झाली होती, असं म्हटलं जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये गौतम गंभीर आणि आर. अश्विन दिसताहेत.

यामध्ये अश्विन भारतीय मुख्य प्रशिक्षकाकडे बोट दाखवत काहीतरी बोलतांना दिसत आहे. गौतम गंभीरही गंभीर दिसत आहे. हा फोटो ब्रिसबेन कसोटी दरम्यानचा असून हा फोटो पाहून या दोघांमध्ये टोकाचा वाद झाला, असावा असा अंदाज लावला जात आहे. परंतु या फोटो मागील खरं कारण या हे सांगता येत नाही. तसेच साम टीव्हीही याला दुजोरा देत नाही. मात्र त्यानंतरच अश्विनने निवृत्ती जाहीर केली.

R Ashwin
R Ashwin Net Worth: किती संपत्तीचा मालक आहे अश्विन? क्रिकेटशिवाय 'या' ठिकाणांहून होते कमाई

पीटीआयच्या वृत्तानुसार, अश्विन निवड समिती आणि गौतम गंभीरवर नाराज होता. त्यामागील कारण होतं आश्वसनाचं. बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, अश्विन न्यूझीलंड मालिकेतील कामगिरीवर खूश नव्हता. मात्र बोर्ड अश्विनला त्याच्या उंचीमुळे त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळण्यास तयार नव्हते. अश्विनने स्वतः निर्णय घ्यावा, अशी त्यांची इच्छा होती. अश्विनने निवडकर्त्यांना आधीच स्पष्ट केले होतं की, जर त्याला ऑस्ट्रेलियात बेंचवर बसवले गेले तर तो दौऱ्यावर जाणार नाही.

R Ashwin
R Ashwin Journey: इंजिनिअर ते क्रिकेटचा सायंटीस्ट; आर अश्विन कसा बनला फिरकीचा जादुगर?

त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची हमी घेऊन अश्विन तेथे गेला. असे असतानाही पर्थ कसोटीमध्ये त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला मैदानात उतरवण्यात आले. त्यावेळीच अश्विनने निवृत्ती घेण्याची ठरवले होते. पण कर्णधार रोहितने त्याची समजूत काढत त्याला निवृत्ती घेण्यापासून रोखलं होतं. नंतर जेव्हा रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाला पोहोचला तेव्हा त्याने अश्विनला प्लेइंग इलेव्हनमध्ये परत संधी दिली.

मात्र ब्रिस्बेन येथे होणाऱ्या पुढील कसोटीत अश्विनला पुन्हा वगळण्यात आले. त्याच्या जागी रविंद्र जडेजाला खेळण्यात आले. या सगळ्या गोष्टींचा अश्विनला राग आला. यामुळे अश्विनलाही आपल्या भविष्याची कल्पना आली आणि त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला, असं सांगितलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com