
आर अश्विन पर्व संपलंय...गाबा कसोटी संपताच अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करत असल्याची घोषणा केली. अश्विनने १,२ वर्ष नव्हे, तर १४ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलं. भारतात खेळताना, अश्विनसमोर फलंदाजी करणं म्हणजे फलंदाजांसाठी वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हतं.
त्याच्या कसोटी क्रिकेटमधील कारकिर्दीबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे. मात्र त्याच्या आयुष्यात काही रोमांचक गोष्टी घडल्या, ज्या खूप कमी लोकांना माहीत आहेत.
अश्विनने जेव्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली, त्यावेळी तो मध्यमगती गोलंदाज होता. मग मध्यमगती गोलंदाज फिरकी गोलंदाज कसा बनला? असा प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल. यामागे त्याचे शाळेतील प्रशिक्षक सीके विजयकुमार यांचा मोलाचा वाटा आहे. एका मुलाखती त्यांनी सांगितलं होतं की, ज्यावेळी अश्विन ११ वीला होता. त्यावेळी तो नेट्समध्ये मध्यमगती गोलंदाजी करायचा. ज्यावेळी त्याला थकवा आला, त्यावेळी तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, मी ऑफ स्पिन गोलंदाजी करु का? त्यावेळी त्यांनी त्याचं म्हणणं ऐकलं. त्यानंतर तो ऑफ स्पिन गोलंदाजी करु लागला. त्याने पुन्हा एकदा येऊन मध्यमगती गोलंदाजी करु का? असं विचारलं होतं. मात्र मी त्याला नकार दिला होता.' असं त्याच्या प्रशिक्षकांनी सांगितलं.
अश्विनचा जन्म १७ सप्टेंबर १९८६ रोजी चेन्नईत झाला होता. त्याचे वडील वेगवान गोलंदाज होते. क्रिकेटसह अश्विन अभ्यासातही प्रचंड हुशार होता. त्याने चेन्नईत आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर एसएसएन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून त्याने IT मध्ये ग्रॅज्यूएशन पूर्ण केलं. त्याने इंजिनिअरिंग तर केली, पण क्रिकेटला आपलं पॅशन बनवलं.
आर अश्विनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येऊन १४ वर्ष झाली आहेत. त्याने २००६ मध्ये हरियाणाविरुद्ध आपला पहिला सामना खेळला होता. या सामन्यात गोलंदाजी करताना त्याने ६ गडी बाद केले होते. त्यानंतर २०१० मध्ये त्याला झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या सामन्यातून पदार्पण करण्याची संधी मिळाली होती.
या सामन्यात त्याने शानदार गोलंदाजी करत २ गडी बाद केले होते. २०११ मध्ये झालेल्या वेस्टइंडीजविरुद्धच्या कसोटीत त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली. या सामन्यातही त्याच्या गोलंदाजीची जादू पाहायला मिळाली. त्याने ९ गडी बाद केले होते. या सामन्यातील पहिल्या डावात ३ आणि दुसऱ्या डावात ६ गडी बाद केले होते.
अभ्यासात इंजिनिअरिंग केलल्या अश्विनला क्रिकेटमध्ये सायंटीस्ट असं म्हटलं जायचं. कारण त्याचा गेम सेन्स इतका चांगला होता, की कुठल्याही स्थितीत सामना असला, तरीदेखील तो पराभवाला मागे सारत विजय खेचून आणायचा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.