R Ashwin Retirement: डोळ्यात पाणी, विराटला मिठी; अश्विनचा निवृत्तीआधीचा भावुक करणारा Video व्हायरल

R Ashwin- Virat Kohli Emotional Video: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीनंतर अश्विनने निवृत्तीची घोषणा केली आहे. दरम्यान एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
R Ashwin Retirement: डोळ्यात पाणी, विराटला मिठी; अश्विनचा निवृत्तीआधीचा भावुक करणारा Video व्हायरल
r ashwintwitter
Published On

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना ड्रॉ राहिला आहे. या सामन्यात भारतीय संघावर पराभवाचं संकट होतं. मात्र भारतीय फलंदाज शेवटपर्यंत लढले. हा सामना ड्रॉ राहिला. ही मालिका सध्या १-१ च्या बरोबरीत आहे.

दरम्यान हा सामना झाल्यानंतर, भारताचा अनुभवी गोलंदाज आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना सुरु असतानाच अश्विनने निवृत्ती घेत असल्याचे संकेत दिले होते. त्याने ड्रेसिंग रुममध्ये भावुक होऊन विराटला मिठी मारली. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि आर अश्विन दोघही पत्रकार परिषदेत आले होते. पत्रकार परिषदेत येताच, आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली.

मात्र सामना सुरु असतानाच अश्विनने निवृत्त होत असल्याची हिंट दिली होती. सामना सुरु असताना विराट आणि अश्विनचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता.

R Ashwin Retirement: डोळ्यात पाणी, विराटला मिठी; अश्विनचा निवृत्तीआधीचा भावुक करणारा Video व्हायरल
IND vs AUS: गाबा कसोटी ड्रॉ झाली, तर टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? पाहा समीकरण

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २७५ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल ही जोडी मैदानावर आली होती. २ षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसाने हजेरी लावली.

त्यामुळे खेळ थांबवावा लागला. त्यावेळी आर अश्विन आणि विराट कोहली एकत्र बसल्याचे दिसून आले होते. त्यावेळी विराटने भावुक होऊन अश्विनला मिठी मारली. हा व्हिडिओ व्हायरल होताच, अश्विन निवृत्त होत असल्याची चर्चा सुरु झाली होती.

R Ashwin Retirement: डोळ्यात पाणी, विराटला मिठी; अश्विनचा निवृत्तीआधीचा भावुक करणारा Video व्हायरल
IND vs AUS: गाबाचा घमंड तोडण्यासाठी टीम इंडिया मैदानात! सामना जिंकण्यासाठी अवघ्या इतक्या धावांची गरज

गाबा कसोटी ड्रॉ

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ४४५ धावांचा डोंगर उभारला.

या धावांचा पाठलाग करताना, भारतीय संघाला २६० धावा करता आल्या. भारताने फॉलोऑन टाळला. तर ऑस्ट्रेलियाकडे पहिल्या डावात मोठी आघाडी होती. ऑस्ट्रेलियाने भारतीय संघासमोर जिंकण्यासाठी २७५ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र पावसाने हजेरी लावल्यामुळे हा सामना ड्रॉ राहिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com