Ind vs Pak: आता पाकिस्तानचं काही खरं नाही! महामुकाबल्यासाठी टीम इंडियात २ धाकड खेळाडूंची एन्ट्री

Team India Playing 11 Prediction For India vs Pakistan Asia Cup Super 4 Match: पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघात २ धाकड खेळाडूंची एन्ट्री होऊ शकते.
Team India Playing 11 Prediction For India vs Pakistan Asia Cup Super 4 Match
Team India Playing 11 Prediction For India vs Pakistan Asia Cup Super 4 MatchSaam tv
Published On

India Vs Pakistan Super 4 match Asia Cup 2023:

आशिया चषकात रविवारी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. कोलंबोच्या मैदानावर रंगणाऱ्या या सामन्यासाठी भारतीय संघात बदल पाहायला मिळू शकतात. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या संघात कमबॅक करताना दिसून येऊ शकतो.

जसप्रीत बुमराह वैयक्तिक कारणास्तव मायदेशी परतला होता. त्यामुळे नेपाळ विरुद्धच्या सामन्यात तो खेळताना दिसून आला नव्हता. बुमराहसह अक्षर पटेलला देखील प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते.

Team India Playing 11 Prediction For India vs Pakistan Asia Cup Super 4 Match
World Cup 2023: वर्ल्डकपसाठी अंपायर्सची यादी जाहीर! यादीत केवळ एकमेव भारतीय

पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या सुपर ४ सामन्यात भारतीय संघ मजबूत प्लेइंग ११ सह मैदानात उतरणार आहे. जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. त्यामुळे बुमराह मुंबईत परतला होता. पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या लढतीत बुमराहला संधी दिली गेली होती. मात्र हा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नव्हता. त्यामुळे त्याला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती.

या सामन्यासाठी भारतीय संघात आणखी एक मोठा बदल होऊ शकतो. अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलला या संघात स्थान दिले जाऊ शकते. अक्षर पटेल हा डावखुऱ्या फिरकी गोलंदाजीसह फटकेबाजी करण्यात देखील तितकाच तरबेज आहे.

जर अक्षर पटेलला या संघात स्थान मिळालं तर शार्दुल ठाकूरला बाकावर बसावं लागेल. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघात ३ वेगवान गोलंदाज आणि २ फिरकी गोलंदाजांचा समावेश केला जाऊ शकतो. ज्यात कुलदीप यादव आणि अक्षर पटेलचा समावेश असू शकतो. (Latest sports updates)

Team India Playing 11 Prediction For India vs Pakistan Asia Cup Super 4 Match
World Cup 2023: शोएब अख्तरची मोठी भविष्यवाणी! एका शब्दात सांगितलं कोण उचलणार वर्ल्डकपची ट्रॉफी

भारत - पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस..

आशियाई क्रिकेट मंडळाने एक मोठी घोषणा केली आहे. भारत - पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. हा सामना १० सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. जर या दिवशी पावसाने खोळंबा घातला तर हा सामना ११ सप्टेंबर रोजी खेळवला जाईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com