ENG vs IND : वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, गौतम गंभीरच्या विश्वासूला संघात स्थान; विराटचं कमबॅक झालं का?

इंग्लंडविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांचे पुनरागमन झाले असून यशस्वी जयस्वालला संघातून वगळण्यात आले आहे.
IND vs ENG
team indiatwitter
Published On

इंग्लंडविरोधात होणाऱ्या ३ सामन्याच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाच्या संघाची आज घोषणा करण्यात आली. विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांच्यासारखे अनुभवी खेळाडू संघात परतले आहेत. दुसरीकडे अफगाणिस्तानविरोधात खेळणाऱ्या काही खेळाडूंना डच्चू देण्यात आला आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक ठोखणाऱ्या यशस्वी जैस्वाललाही संघातून वगळण्यात आले आहे. इंग्लंडविरोधात कुणाला स्थान मिळाले? कुणाचा पत्ता कट झाला? इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक कसे असेल?

अफगाणिस्तानविरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेत लखनौमध्ये पदार्पण केलेल्या प्रिन्स यादवला इंग्लंड दौऱ्यात डच्चू मिळाला आहे. त्याशिवाय अष्टपैलू हर्ष दुबे यालाही संघात स्थान मिळाले नाही. अनुभवी विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांच्याबरोबरच अक्षर पटेल याचे वनडे संघात पुनरागमन झाले आहे. पण हार्दिक पांड्या अद्याप दुखापतीतून सावरलेला नाही. सध्या नितीश कुमार रेड्डी भारताचा अष्टपैलू खेळाडू म्हणून इंग्लंडमध्ये उतरेल. विराट कोहली अजूनही तंदुरुस्ती चाचण्या देत आहे. संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला तंदुरुस्ती चाचणी उत्तीर्ण करावी लागेल.

IND vs ENG
अंगावर काटा आणणारा अपघात! २५१ kmph वेगातील BMW चा चुराडा; हायवेवर मृतदेहांचे अवयव विखुरले

भारताचा एकदिवसीय संघ खालीलप्रमाणे आहे:

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली*, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिध्द कृष्णा, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, गुरनूर ब्रार

अफगाणिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्याच्या अगदी आधी हर्षित राणाला संघात स्थान देण्यात आले. इंग्लंडमधील एकदिवसीय मालिकेसाठी निवडलेल्या १५ सदस्यीय संघात त्याचा समावेश असेल. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे स्थान मिळाले आहे. इंग्लंडमधील वेगवान गोलंदाजीच्या आक्रमणात जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, अर्शदीप सिंह आणि नितीश कुमार रेड्डी यांचा समावेश आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका १४ जुलैपासून सुरू होईल. पहिला सामना एडजबॅस्टन येथे खेळला जाणार आहे. मालिकेतील दुसरा सामना १६ जुलै रोजी कार्डिफमध्ये, तर अंतिम सामना १९ जुलै रोजी लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळला जाईल.

टी२० संघातही एक बदल

आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या दोन टी-२० सामन्यांसाठी निवड समितीला संघात बदल करावे लागले आहेत. वरुण चक्रवर्ती सध्या अनफिट आहे. त्याच्या जागी हर्षित राणाचा संघात समावेश करण्यात आला आहे.

IND vs ENG
धक्कादायक! व्यायाम करताना पोलीस कर्मचाऱ्याला जिममध्ये हार्ट अटॅक; जागेवरच दुर्दैवी मृत्यू, थरारक व्हिडीओ समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com