

Team India: भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेला आजपासून प्रारंभ होणार आहे. या मालिकेतून भारतीय संघ मिशन वनडे वर्ल्डकपला प्रारंभ करणार आहे. इथून पुढे एकूण एक सामना हा भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.
कारण भारतीय संघाला यावर्षी वनडे वर्ल्डकप स्पर्धा खेळायची आहे. ही स्पर्धा भारतात पार पडणार असल्याने भारतीय संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. मात्र भारतीय संघासाठी ही स्पर्धा जिंकणं मुळीच सोपं नसणार आहे.
वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला १२ सामने खेळायचे आहेत. या १२ सामन्यांमध्ये भारतीय संघाला १० प्रश्नांची उत्तरं शोधावी लागणार आहे. कोणती आहेत ती १० प्रश्ने? जाणून घ्या.
पहिला प्रश्न: तिसरा सलामीवीर फलंदाज कोण?
भारतीय संघाकडे ऋतुराज गायकवाड, ईशान किशन आणि शिखर धवन या ३ फलंदाजांचा पर्याय शिल्लक आहे. मात्र या तिघांपैकी श्रेष्ठ कोण? हे भारतीय संघाला शोधून काढावं लागणार आहे.
प्रश्न दुसरा: कोण असेल यष्टीरक्षक फलंदाज?
काही महिन्यांपूर्वी रिषभ पंत हा भारतीय संघाचा फिक्स यष्टीरक्षक फलंदाज होता. मात्र तो सध्या संघाबाहेर आहे. रिषभ पंतच्या अनुपस्थितीत केएल राहुल, संजू सॅमसन आणि ईशान किशन हे ३ पर्याय भारतीय संघासमोर आहेत.
प्रश्न तिसरा: चौथ्या क्रमांकावर कोण येणार ?
या क्रमांकावर खेळण्यासाठी भारतीय संघासमोर २ पर्याय आहेत. ज्यात श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांचा समावेश आहे. मात्र दोघांपैकी कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
चौथा प्रश्न: हार्दिक पंड्याचा पर्यायी खेळाडू कोण?
हार्दिक पंड्या अनेकदा दुखापतीमुळे संघाबाहेर झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे भारतीय संघासमोर असलेला प्रश्न म्हणजे जर हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त झाला तर त्याच्याऐवजी कोण खेळणार? त्यामुळे येणाऱ्या १२ सामन्यांमध्ये भारतीय संघाला हार्दिक पंड्याचा पर्यायी खेळाडू शोधावा लागणार आहे.
पाचवा प्रश्न: कुलदीप आणि चहलची जोडी खेळणार का?
कुलदीप आणि चहलच्या जोडीने मिळून अनेकदा भारतीय संघासाठी मोलाची कामगिरी केली आहे. मात्र हे दोघे एकत्र खेळताना दिसून येतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (Latest sports updates)
सहावा प्रश्न: बुमराह खेळणार का?
बुमराह खेळणार का? हा अनेकांना पडणारा प्रश्न आहे. काही दिवसांपूर्वी बुमराह गोलंदाजीचा सराव करताना दिसून आला होता. मात्र त्याला जर वर्ल्डकप खेळायचा असेल तर येणाऱ्या काही सामन्यांमध्ये त्याने कमबॅक करणं गरजेचं असणार आहे.
सातवा प्रश्न: भारतीय संघाचा डाव्या हाताचा गोलंदाज कोण?
भारतीय संघाच डाव्या हाताच्या गोलंदाचांची कमी नाही, मात्र महत्वाच्या स्पर्धेत कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
आठवा प्रश्न: टॉस गमावल्यावर काय होणार?
आगामी वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा थरार भारतात रंगणार आहे. संध्याकाळच्या सामन्यात दुसऱ्या इंनिंगमध्ये डवचे प्रमाण अधिक असेल. त्यामुळे टॉस जिंकणं भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचं असणार आहे. मात्र टॉस गमावल्यास काय? याचा देखील भारतीय संघाला पर्याय शोधून काढला आहे.
नववा प्रश्न: पंत कमबॅक करणार का?
रिषभ पंतची रिकव्हरी प्रोसेस सुरू झाली आहे. मात्र तो भारतीय संघाच कमबॅक करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दहावा प्रश्न: सिराज वर्ल्ड कप खेळणार का?
सिराजला वेस्टइंडीज विरूद्धच्या वनडे मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. यानंतर आता असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे की, वर्ल्डकप तोंडावर असताना सिराजला विश्रांती का दिली गेली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.