T20 World Cup
T20 World CupGoogle

T20 World Cup: टीम इंडियानं वर्ल्डकप ट्रॉफी जिंकताच अजहरनं नवस फेडला! दर्ग्यापर्यंत अनवाणी चालत गेला!

T 20 World Cup Winner: भारताने टी-२- विश्वचषक जिकल्यानंतर संपूर्ण देशभरात आनंद साजरा केला गेला. अनेक क्रिकेटप्रेमींनी भारत विश्वचषक जिंकावा यासाठी नवस बोलला होता. असाच नवस मिरजमधील एका युवकाने बोलला होता.

भारताने टी-२० विश्वचषक जिंकून नवी इतिहास रचला आहे. तब्बल १३ वर्षांनी भारताने विश्वचषक जिंकला आहे. भारतीय संघाचे संपूर्ण जगभरात कौतुक केले जात आहे. भारतीय संघ जिंकावा यासाठी क्रिकेटप्रेमींनी देवासमोर हात जोडले होते, नवस बोलले होता. मिरजमधील अझहर लंबे यानेदेखील भारत विश्वचषक जिंकू दे यासाठी नवस बोलला होता. मिरजमधील मिरासाब दर्ग्यापर्यंत अनवाणी जाईन, असा नवस त्याने बोलला होता. त्याने हा नवस फेडला आहे.

टी-२० विश्वचषक जिंकण्याचे भारतीयांचे स्वप्न होते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संपूर्ण टीमने आपले नाव विश्वचषकावर कोरले. साउथ आफ्रिकेविरोधात चांगली खेळी खेळली. भारतीय संघाचा विजय व्हावा, संघाला विश्वकरंडक मिळावा, यासाठी अजहरने नवस बोलला होता. अजहरने विश्चचषक जिकल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अनवाणी पायाने दर्ग्याला गेला आणि नवस फेडला.

T20 World Cup
RCB Coach: जवळचा मित्र बनला विराटचा 'गुरु', RCBला पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी करणार मदत

अझहरने गणेशनगर ते दर्ग्यापर्यंत अनवाणी प्रवास केला. मिरजेतील मिरासाब दर्ग्याजवळ आल्यावर दर्गा खादीमतर्फे त्याचा सत्कार करण्यात आला. अझहरने दर्ग्यात जाऊल साकडे घालत आपला नवस फेडला आणि भारतीय संघाचे अभिनंदन केले.

भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण होते.अनेकांना फटाके फोडत, टीम इंडियाच्या नावाने घोषणा देत आपला आनंद साजरा केला. प्रत्येक भारतीयासाठी हा खूप अभिमानाचा क्षण होता.

T20 World Cup
T20 World Cup 2024: या 5 शिलेदारांच्या बळावर टीम इंडियाने गाठली T-20 WC ची फायनल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com