T20 World Cup : पाकविरुद्धच्या सामन्यानंतर आर. अश्विन क्रिकेटमधून संन्यास घेणार होता, पण..

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या चेंडूच्या आर. अश्विनच्या मनात काय चाललं होतं, हे त्याने स्वतः उघड केलं आहे.
R Ashwin reveals Retirement plan
R Ashwin reveals Retirement plansaam tv
Published On

Ravichandran Ashwin Latest News : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना रोमहर्षक झाला. अखेरच्या षटकापर्यंत लांबलेला हा सामना प्रत्येक भारतीयाचा आणि क्रिकेटप्रेमींचा श्वास रोखून धरणारा होता. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर आर. अश्विननं अखेरचा चेंडू मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या वरून खेळून धाव घेतली आणि संपूर्ण भारत जल्लोष करू लागला. भारतानं पाकिस्तानवर विजय मिळवला.

R Ashwin reveals Retirement plan
BCCI चा मोठा निर्णय; महिला क्रिकेटपटूंनाही विराट-रोहित शर्माएवढेच मानधन

टी २० वर्ल्डकपमधील (T20 World Cup) या सामन्यातील विजयानं संपूर्ण देशात अक्षरशः दिवाळी साजरी झाली. पण त्याचवेळी शेवटच्या चेंडूवर विजय मिळवणाऱ्या आर. अश्विनच्या मनात भलतंच चाललं होतं.

अश्विननेच ही बाब उघड केलीय. या सामन्यानंतर अश्विन क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणार होता. पण मैदानावरील त्या निर्णायक दोन मिनिटांनी सर्वकाही बदललं. मनात चाललेला विचार झटक्यात बदलला. अश्विन या सामन्याच्या विजयाचा हिरो ठरला.

R Ashwin reveals Retirement plan
Virat Kohli : विराट कोहलीने टी-२० मधून निवृत्त व्हावं; पाकच्या माजी खेळाडूचा अजब सल्ला

टीम इंडिया (Team India) आणि पाकिस्तान यांच्यातील पहिलाच सामना अटातटीचा झाला. या सामन्याचा निर्णय अखेरच्या चेंडूवर लागला. अखेरच्या षटकात अश्विन फलंदाजीसाठी उतरला तेव्हा सामना अटातटीचा सुरू होता.

अश्विनला शेवटचा चेंडू खेळायचा होता आणि त्यावर दोन धावांची गरज होती. नवाजने चेंडू फेकला. अश्विन जागीच उभा राहिला. हा चेंडू वाइड गेला. त्यानंतर अखेरच्या चेंडूवर एकच धाव हवी होती. जर या चेंडूवर एक धाव काढून विजय मिळवून दिला नाही तर, थेट ड्रेसिंग रुममध्ये जाऊन निवृत्तीची घोषणा करणार होतो, असा विचार मनात आल्यानं स्वतः अश्विनने सांगितले.

सामन्यानंतर निवृत्तीची घोषणा करणार होता अश्विन

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर बीसीसीआय टीव्हीवर ऋषिकेश कानिटकर याच्याशी बोलताना अश्विनने खुलासा केला आहे. त्या अखेरच्या चेंडूच्या आधी माझ्या मनात एकच गोष्ट सुरू होती. जर नवाजचा तो चेंडू माझ्या पायावर आदळला असता तर मी ड्रेसिंग रुममध्ये जाऊन एकच गोष्ट करणार होतो. मी माझ्या ट्विटर हँडलवरून एक मेसेज टाइप करणार होतो. तुमचे सर्वांचे खूप आभार. ही खूपच उत्तम क्रिकेट कारकीर्द होती. धन्यवाद, असे अश्विनने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com