BCCI चा मोठा निर्णय; महिला क्रिकेटपटूंनाही विराट-रोहित शर्माएवढेच मानधन

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केली.
BCCI Indian women cricketers
BCCI Indian women cricketersSaam TV
Published On

BCCI, Cricket News : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. महिला क्रिकेटपटूंनाही पुरूष क्रिकेटपटूंप्रमाणे सामन्याचे मानधन मिळणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

बीसीसीआयमध्ये (BCCI) मोठ्या बदलांना सुरुवात झालेली आहे. बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश असलेल्या महिला क्रिकेटपटूंना पुरूष क्रिकेटपटूंप्रमाणेच समान सामन्याचे मानधन मिळणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

BCCI Indian women cricketers
बीसीसीआय झाली मालामाल! टीव्ही आणि डिजिटलचे हक्क ४३,००० कोटींना विकले

भेदभाव दूर करण्याच्या दिशेने बीसीसीआयने हे पहिले पाऊल टाकले आहे. त्याची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे. बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश असलेल्या महिला क्रिकेटपटूंसाठी समान वेतन धोरण लागू करण्यात येत आहे. आता महिला आणि पुरूष क्रिकेटपटूंना एकसमान सामन्याचे मानधन मिळणार आहे. या निर्णयाद्वारे आपण क्रिकेटमध्ये लैंगिक समानतेच्या एका नव्या युगात प्रवेश करत आहोत, असे जय शहा यांनी म्हटलं आहे. (Tajya Batmya)

BCCI Indian women cricketers
IND VS NED T20 LIVE : भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढं फलंदाज ढेर, भारताचा नेदरलॅंडवर दणदणीत विजय

बीसीसीआयने सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश असलेल्या महिला क्रिकेटपटूंना पुरुषांप्रमाणेच समान मानधन देण्याचा निर्णय घेतला असला तरी, दोघांच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये मोठा फरक असल्याचे सांगितले जात आहे. २०२१-२२ मध्ये बीसीसीआयने महिला क्रिकेटपटूंना तीन वर्गात कॉन्ट्रॅक्ट दिले आहेत. ए कॅटगरीत खेळाडूंना ५० लाख, बी कॅटगरीतील खेळाडूंना ३० लाख आणि सी कॅटेगरीतील खेळाडूंना १० लाख रुपये देण्यात येत आहेत.

याच कालावधीसाठी बीसीसीआयने पुरूष खेळाडूंना चार कॅटगरीत समाविष्ट केलेले आहे. ए प्लस कॅटगरीतील खेळाडूंना ७ कोटी, ए कॅटगरीसाठी ५ कोटी, बी कॅटगरीतील खेळाडूंना ३ कोटी आणि सी कॅटगरीतील खेळाडूंना १ कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

मात्र, आता रक्कम कैक पटीने वाढली आहे. आता एका कसोटीसाठी महिला क्रिकेटरला मानधन स्वरुपात चार पटीने रक्कम मिळणार आहे. वनडेसाठी ही रक्कम तीन पटीने वाढली आहे. याआधी भारतीय महिला क्रिकेटपटूंना कसोटीसाठी चार लाख रुपये, तर वनडे सामन्यासाठी २ लाख, टी २० सामन्यासाठी अडीच लाख रुपये देण्यात येत होते. आता हीच रक्कम कैक पटीने वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com