बीसीसीआय झाली मालामाल! टीव्ही आणि डिजिटलचे हक्क ४३,००० कोटींना विकले

भारतात होणाऱ्या आयपीएल सामन्यांचे टीव्ही आणि डिजिटलचे हक्क विकण्यात आले आहेत.
IPL Media Rights
IPL Media RightsSaam Tv
Published On

नवी दिल्ली : दोन दिवसांपासून आयपीएल (IPL) च्या सामन्यांच्या टीव्ही आणि डिजिटलचे हक्क विकण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढच्या ५ वर्षासाठी हे हक्क विकले जाणार आहेत, यासाठी टीव्ही हक्कासाठी प्रत्येक सामन्याला ५७.५० कोटी रुपये आणि डिजिटल हक्क ४८ कोटी रुपये प्रत्येक सामन्यासाठी बोली लावल्याचे बोलले जात आहे. या हक्कांसाठी बीसीसीआयला ४३००० कोटींहून अधिक किमत मिळाली असल्याचे बोलले जात आहे. टीव्ही आणि डिजिटल या दोन्हींचे हक्क प्रति सामना १०५.५ कोटी रुपये करण्यात आल्याचे बोलले जात आहे. (IPL Media Rights)

या बोलीमध्ये पॅकेज A आणि पॅकेज B दोन वेगवेगळ्या कंपन्यांनी खरेदी केले आहेत. आता पॅकेज A जिंकणारी कंपनी पॅकेज B खरेदी करणार असल्याचे बोलले जात आहे, दोन्ही पॅकेज एकच कंपनी खरेदी करणार की वेगवेगळ्या कंपन्या खरेदी करणार हे अजुनही समोर आलेले नाही. पहिल्याच दिवशी या बोलीमधून अॅमेझॉन (Amazon) बाहेर पडल्याची बातमी समोर आली आहे.

IPL Media Rights
राहुल गांधींनी २ हजार कोटींची प्रॉपर्टी हडप केली; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

स्टार इंडियाने सप्टेंबर २०१७ मध्ये १६,३४७.५० कोटी रुपयांना २०१७ ते २२ पर्यंत हक्क विकत घेतले होते. या बोलीमध्ये सोनी पिक्चर्सला स्टार इंडियाने पाठिमागे टाकले होते. या करारामुळे आयपीएलच्या एका सामन्याची किंमत जवळपास ५५ कोटी रुपयांवर गेली होती.

२००८ मध्ये सोनी पिक्चर्स नेटवर्क्सने ८,२०० कोटी रुपयांच्या बोलीने १० वर्षांसाठी आयपीएल हक्क घेतले होते. तीन वर्षांसाठी आयपीएलचे जागतिक डिजिटल हक्क नोव्ही डिजिटलने ३०२.२ कोटींना घेतले होते.

IPL Media Rights
स्टार फुटबॉलपटू रोनाल्डोवर केला होता बलात्काराचा आरोप, न्यायालयात झाली सुनावणी

आयपीएलच्या (IPL) या वर्षीच्या हंगामात दोन टीम वाढवण्यात आल्या होत्या. या गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन संघाचा समावेश होता. या हंगामाच्या चषकावर गुजरात टायटन्सने आपले नाव कोरले आहे. (IPL Media Rights)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com