T20 World Cup : टीम इंडियाला मोठा झटका, ऑलराउंडर खेळाडू होणार बाहेर; स्टार खेळाडूची एन्ट्री कन्फर्म

Team India squad in T20 World Cup 2026 : आयसीसी टी २० वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच भारतीय संघाला मोठा झटका मिळाला आहे. ऑलराउंडर हर्षित राणा हा बाहेर होणार असून, त्याच्या जागी मोहम्मद सिराजची संघात एन्ट्री झाली आहे.
Team India Squad For T20 World Cup 2026
Team India Squad For T20 World Cup 2026saam tv
Published On

टी २० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेला सुरुवात होणार असून, पहिला सामना ७ फेब्रुवारीला मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. त्याआधीच भारतीय क्रिकेट संघाला मोठा झटका मिळाला आहे. वेगवान गोलंदाज आणि ऑलराउंडर म्हणून अल्पावधीतच प्रकाशझोतात आलेला हर्षित राणा दुखापतीमुळं बाहेर होण्याची शक्यता आहे. राणा हा मुख्य चमूमध्ये होता. सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना त्याला दुखापत झाली होती. एएनआयच्या रिपोर्टनुसार, हर्षित राणाच्या जागी मोहम्मद सिराज याला संघात संधी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कळते. त्याची अधिकृत घोषणा लवकरच होईल.

हर्षित राणाबाबत लवकरच निर्णय?

भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव यानं यूएसए विरुद्ध होणाऱ्या सामन्याच्या आधी झालेल्या पत्रकार परिषदेत हर्षित राणाच्या फिटनेसबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिले. हर्षित अद्याप बाहेर झालेला नाही. पण त्याच्या खेळण्याबाबत शंका आहे. ६ फेब्रुवारी संध्याकाळपर्यंत याबाबत माहिती मिळेल, असे सूर्यकुमार म्हणाला.

Team India Squad For T20 World Cup 2026
Ind U19 vs Eng U 19 Final : ८० बॉल, १७५ रन्स, १५ फोर, १५ सिक्स....वैभव सूर्यवंशीची फायनलमध्ये तोडफोड इनिंग, इतिहास रचला!

हर्षित राणा जर बाहेर गेला तर, त्याच्या जागी कोणाला संघात घेणार याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर मागील एक-दोन वर्षात कोणत्या वेगवान गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे, जे फलंदाजीही करू शकतील याचा विचार केला जाईल. पण जर नवव्या क्रमांकावर येणाऱ्या खेळाडूकडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा करत आहात, तर मग वरचे आठ खेळाडू काय करत आहेत, असा प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही सर्वात चांगल्या खेळाडूच्या निवडीचा प्रयत्न करू, असं सूर्यकुमार यादवनं स्पष्ट केलं.

मोहम्मद सिराजला संधी मिळणार?

हर्षित राणा संघाबाहेर झाल्यास मोहम्मद सिराज याचा भारतीय संघाच्या चमूमध्ये समावेश करण्याची शक्यता आहे. त्याची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. सिराज हा कसोटी, वनडे संघातील महत्वाचा भाग आहे. मात्र, तो गेल्या दीड वर्षात एकही टी २० आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. २०२४ मध्ये श्रीलंका दौऱ्यावर तो अखेरचा टी २० आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. आतापर्यंत सिराज १६ टी २० सामने खेळला असून, त्यात १४ विकेट्स घेतल्या आहेत. जमेची बाजू म्हणजे टी २० मध्ये त्याचा इकॉनॉमी रेट आठपेक्षा कमी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com