'सूर्योदय' जाहला...वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात सूर्यकुमारचं तुफान, USA समोर १६२ धावांचं टार्गेट

India vs USA match : वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात सूर्यकुमारने तुफान फलंदाजी केली. टीम इंडियाने यूएसएला १६२ धावांचं टार्गेट दिलं.
suryakumar yadav news
suryakumar yadav Saam tv
Published On
Summary

भारत विरुद्ध यूएसए मध्ये सामना होतोय

यूएसएने प्रथम गोलंदाजी करत भारताला जेरीस आणलं

सूर्यकुमार यादवने ८४ धावांची दमदार खेळी खेळली

आयसीसी मेन्स टी२० वर्ल्डकप स्पर्धेच्या तिसरा सामना भारत आणि यूएसए संघामध्ये झाला. या दोन्ही संघाचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात यूएसएने प्रथम गोलंदाजी करताना भारताच्या फलंदाजांना जेरीस आणलं. टीम इंडियाने यूएसएला १६२ धावांचं लक्ष्य दिलं आहे. टीम इंडियासाठी सूर्यकुमारने ४९ चेंडूत ८४ धावा केल्या. यात १० चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे.

यूएसएने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अभिषेक शर्मा पहिल्याच चेंडूत बाद झाला. तर सहाव्या षटकात ईशान किशनच्या रुपात भारताला दुसरा झटका बसला. त्यात षटकात तिलक वर्मा बाद झाला. शिवम दुबे देखील शून्य धावांवर बाद झाला. रिंकू सिंह अवघ्या ६ धावांवर बाद झाला. तर हार्दिक पंड्या ५ धावांवर बाद झाला.

suryakumar yadav news
PM मोदी-राहुल गांधी संसदेत भिडले? व्हायरल फोटोमागचं सत्य काय? VIDEO

टीम इंडियाने १३ षटकात ७७ धावा करून ६ गडी बाद झाले होते. अवघ्या १३ षटकात टीम इंडिया यूएसएच्या जाळ्यात अडकली होती. यूएसएच्या गोलंदाजांनी टीम इंडियाच्या फलंदाजांची दाणादाण उडवली.

सूर्यकुमारने लाज राखली

टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज बाद होत असताना सूर्यकुमार यादव मैदानावर टिकून होता. सूर्यकुमार यादव इतर फलंदाजाच्या साथीने धावसंख्या करत होते. सूर्यकुमार यादवने १७१ च्या सरासरीने फलंदाजी करताना भारताची धावसंख्या १६० पार नेली.

suryakumar yadav news
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींची ई-केवायसी पुन्हा सुरू; २ प्रश्नांची उत्तरे अचूक द्या, मिळवा झटपट ४५०० रुपये

सूर्यकुमार यादवने ४९ चेंडूत ८४ धावा कुटल्या. या धावसंख्येत १० चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे. टीम इंडियाने २० षटकात ९ गडी गमावून १६१ धावा कुटल्या. यूएसएसाठी वॅन शेल्विकने ४ फलंदाजांना बाद केले. हरमीत सिंहने दोन गडी बाद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com