team india
team indiasaam tv

Sunil Gavaskar: दारुण पराभवानंतर सुनील गावसकर टीम इंडियावरच भडकले! वादग्रस्त वक्तव्य करत म्हणाले....

Team India: माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांनी भारतीय संघाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
Published on

Sunil Gavaskar On Team India: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना झाल्यानंतर आता भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला ३ वनडे, ५ टी-२० आणि २ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे .

या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांनी भारतीय संघाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

team india
Viral Cricket Video: टी-२० क्रिकेटमधील सर्वात महागडा चेंडू! पठ्ठ्याने एकाच चेंडूवर खर्च केल्या तब्बल १८ धावा; VIDEO एकदा पाहाच

भारतीय संघाच्या पराभवावर सुनील गावसकर भडकले..

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना रंगला होता. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. यासह भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्याची संधी गमावली आहे.

या पराभवानंतर सुनील गावसकरांनी भारतीय संघाच्या सुमार कामगिरीवर भाष्य केलं आहे. याबाबत बोलताना सुनील गावसकर म्हणाले की, 'भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात झालेला पराभव विसरू नये. वेस्ट इंडिज हा जगातील काही मजबूत संघ नाही. तुम्ही या संघाला २-० ने किंवा ३-० ने जरी पराभूत केलं तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण तुम्ही एखाद्या मजबूत संघासोबत किंवा ऑस्ट्रेलिया संघासोबत पुन्हा एकदा खेळणार तेव्हा त्याच चुका करणार.असं सुरु राहिल्यास तुम्ही ट्रॉफी तरी कशी जिंकणार.' (Latest sports updates)

team india
Suryakumar Yadav: मिस्टर ३६० ला बॉलिंग करताना पाहिलंय का? कारकिर्दीतील सर्वोत्तम चेंडू टाकत घेतला भन्नाट कॅच; VIDEO पाहायलाच हवा

तसेच ते पुढे म्हणाले की, ' जेव्हा आम्ही ४२ धावांवर ऑल आउट व्हायचो तेव्हा आमच्या ड्रेसिंग रूमचं वातावरण तापलेलं असायचं. आम्हाला टिकेचा सामना करावा लागायचा. मात्र आताची परिस्थिती ही फार वेगळी आहे. भारतीय संघाला विचार करावा लागेल की, त्यांचं नेमकं चुकलं तरी कुठं.गोलंदाजी आणि फलंदाजीत कुठे चूक झाली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध जी प्लेइंग ११ उतरवली होती, ती योग्य होती का? भारतीय संघाला या प्रश्नांचं उत्तर शोधावं लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com