

Indian Team Captain: भारताचा कर्णधार सुनील छेत्री याने भारतीय फुटबॉलमध्ये क्रांती घडवून आणली आहे. आंतरराष्ट्रीय फूटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो टॉप ५ मध्ये आहे. सुनील छेत्री सध्या ३८ वर्षांचा आहे.
त्यामुळे अनेकांनी असा प्रश्न उपस्थित केला आहे की, तो निवृत्त केव्हा होणार? आता निवृत्तीबाबत बोलताना सुनील छेत्रीने मोठा खुलासा केला आहे. (Sunil Chhetri On Retirement)
भारतीय संघाचा सेमी फायनलचा सामना लेबनान संघासोबत रंगणार आहे. या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सुनील छेत्री म्हणाला की, 'मला खरच माहित नाही, मी देशासाठी शेवटचा सामना केव्हा खेळणार.
मी कधीच लॉंग टर्म प्लॅन केले नाहीत. मी येणाऱ्या सामन्याचा आणि पुढील १० दिवसांचा विचार करत असतो. निवृत्तीबद्दल बोलायचं झालं तर, एक दिवस नक्कीच निवृत्ती घ्यावी लागणार आहे. मात्र या गोष्टीचा मी जास्त विचार करत नाही.' (Latest sports updates)
भारताचा सर्वोत्कृष्ठ खेळाडूंपैकी एक..
तसेच तो पुढे म्हणाला की, 'मी काही मापदंड ठरवले आहेत. मी संघासाठी योगदान देऊ शकतोय का, मी संघासाठी गोल करू शकतोय का, मला जसा हवा आहे तसा सराव मी करू शकतो का? हे काही मापक आहेत जी मी ठरवून ठेवली आहेत. ज्या दिवशी मला वाटेल की, मी हे करू शकत नाही. त्याच दिवशी मी फुटबॉलला राम राम करेल. कारण त्यानंतर खेळण्यात काही अर्थ राहणार नाही.'
निवृत्त केव्हा होणार?
पुढे तो म्हणाला की, ' हे (निवृत्त) एक महिन्याने होणार की एका वर्षाने होणार, मी काहीच सांगू शकत नाही. माझ्या कुटुंबातील सदस्य देखील मला याबाबत प्रश्न विचारात असतात. त्यांनी मला काही विचारलं की, मी त्यांना माझी आकडेवारी सांगतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.