
टी -२० क्रिकेटमधील नंबर १ चा फलंदाज.. भारतीय टी-२० संघाचं कर्णधारपद हे सर्व सूर्यकुमार यादवला अवघ्या ३ वर्षांच्या कालावधीत मिळालं आहे. टी -२० क्रिकेटमध्ये मिस्टर ३६० म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूर्याने मैदानाचा असा एकही कोना सोडला नसेल जिथे त्याने चेंडू पोहोचवला नसेल.
मात्र सूर्यकुमारच्या कामगिरीचा चढता आलेख झपाट्याने खाली उतरलाय. गेल्या काही महिन्यांपासून सूर्याची बॅट शांतच राहिली आहे. इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यातही त्याचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे.
सूर्यकुमार यादव असा फलंदाज आहे, जो फलंदाजीला येऊन पहिलाच चेंडू सीमारेषेपार पोहोचवण्याची क्षमता ठेवतो. मात्र कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर त्याच्या कामगिरीत मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत तो एक सारख्याच चेंडूवर बाद झाला. या मालिकेतील पाचही सामन्यांमध्ये त्याला फलंदाजीला करण्याची संधी मिळाली. मात्र या मालिकेत त्याला अवघ्या २८ धावा करता आल्या.
सूर्यकुमार यादवने अनेकदा भारतीय संघ अडचणीत असताना फलंदाजीला येऊन संघाला अडचणीतून बाहेर काढलं आहे. मात्र या मालिकेत इंग्लंडच्या गोलंदाजांनी सूर्याला शांत ठेवण्याचा तोडगा शोधून काढला होता. त्यामुळे सूर्याला केवळ दोन वेळेस दुहेरी धावसंख्या गाठता आली.
दुसऱ्या सामन्यात त्याने १२ आणि तिसऱ्या सामन्यात १४ धावांची खेळी केली. तर मालिकेतील पहिल्या सामन्यात आणि चौथ्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला. सू्र्याची फलंदाजी शैली वाघासारखी आहे. मैदानात येताच तो गोलंदाजांवर हल्ला करतो आणि धावा कुटायला सुरुवात करतो. मात्र या मालिकेत त्याला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही.
टी-२० मालिका झाल्यानंतर आता भारतीय संघ वनडे मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारतीय खेळाडू या मालिकेसाठी नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. तर उर्वरीत खेळाडू रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी आपल्या संघात परतले आहेत. सूर्यकुमार यादव देखील मुंबई संघासोबत जोडला गेला आहे. त्याला हरियाणाविरुद्ध होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीसाठी मुंबई संघात स्थान दिलं गेलं आहे. सूर्यासह शिवम दुबे देखील ही स्पर्धा खेळताना दिसून येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.