
भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील तिसरा सामना सोडला, तर उर्वरीत चारही सामन्यांमध्ये भारतीय खेळाडू इंग्लंडवर भारी पडल्याचे पाहायला मिळाले.
सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकल्यानंतर इंग्लंडने तिसरा सामना जिंकून मालिकेत कमबॅक केलं. त्यानंतर पुढील दोन्ही सामने जिंकून भारताने ५ सामन्यांची मालिका ४-१ ने आपल्या नावावर केली. आता टी-२० नंतर दोन्ही संघ वनडे मालिका खेळण्यासाठी आमनसामने येणार आहेत.
भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या वनडे मालिकेला येत्या ६ फेब्रुवारीपासून रंगणार आहे. मालिकेतील पहिला सामना नागपूरमध्ये रंगणार आहे. या सामन्यासाठी भारत आणि इंग्लंडचा संघ नागपूरमध्ये दाखल झाला असून, खेळाडूंनी सराव करायला देखील सुरुवात केली आहे.
दरम्यान टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, टी-२० मालिका गाजवणारा फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती अजूनही भारतीय संघासोबत असल्याचं दिसून आलं आहे. जर त्याला भारतीय वनडे संघात स्थान मिळालं तर ही इंग्लंड संघाचं टेन्शन वाढवणारी बातमी आहे. (Varun Chakravarthy)
इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात फिरकी गोलंदाज म्हणून वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांना संधी देण्यात आली आहे. मात्र वरुण चक्रवर्ती अजूनही भारतीय संघासोबत आहे. यावरुन वरुण चक्रवर्तीला संघात स्थान मिळणार की काय? अशी चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.
इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत वरुण चक्रवर्तीने इंग्लंडच्या फलंदाजाचं टेन्शन वाढवलं होतं. वरुणला गेले काही महिने संघात स्थान मिळत नव्हतं. मात्र एकदा संधी मिळाल्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेलं नाही. इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत गोलंदाजी करताना त्याने ५ सामन्यांमध्ये सर्वाधिक १४ गडी बाद केले होते. त्यामुळे त्याला वनडे संघात स्थान मिळणार का? हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.