Cricketer dies: धक्कादायक! फलंदाजी करताना अचानक कोसळला आणि...! लाईव्ह सामन्यात क्रिकेटपटूचा मृत्यू

एका क्रिकेट सामन्यादरम्यान ४५ वर्षीय खेळाडू झुल्फिकार मैदानावर कोसळून मृत्यूमुखी पडला. ही घटना लाईव्ह सामन्यात घडली असून मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या घटनेनंतर खेळाडूंच्या आरोग्य सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला.
Cricketer dies
Cricketer diessaam tv
Published On

श्रीलंकेतील क्रिकेट विश्वाला रविवारी मोठा धक्का बसला. बेरुआलामध्ये माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्यादरम्यान एका खेळाडूचा मैदानावरच मृत्यू झाला. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत खेळाडूचं नाव झुल्फिकार असून तो ४५ वर्षांचा होता.

बेरुआलाच्या चायना फोर्ट परिसरातील एका प्रसिद्ध शाळेच्या माजी विद्यार्थ्यांसाठी क्रिकेट इव्हेंट्सचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत झुल्फिकारही सहभागी झाला होता. सामना सुरू असताना तो फलंदाजी करत होता. मात्र खेळ सुरू असतानाच तो अचानक क्रीजवर कोसळला आणि मैदानावरील सर्वांनाच मोठा धक्का बसला.

Cricketer dies
Salman Khan Video : "60 साल का हो गया हूँ, लेकीन लडना नहीं भूला..."; सलमान खान कुणावर भडकला?

हा सामना लाईव्ह सुरू असताना ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यातही कैद झाली. झुल्फिकारने तीन चेंडूंमध्ये सहा रन्स केले होते. तो कोसळल्यानंतर सामना तातडीने थांबवण्यात आला. त्या वेळी ३.४ ओव्हर्समध्ये टीमचा स्कोर ३७ रन्सवर ५ बाद अशी होती.

Cricketer dies
पृथ्वी शॉ-आकृती अग्रवालचं बिनसलं? साखरपुड्याचे फोटो डिलीट करत केलं एकमेकांना 'अनफॉलो'

घटना घडताच मैदानावरील खेळाडूंनी तात्काळ धाव घेत झुल्फिकारला मदत केली. त्यानंतर त्याला त्वरित बेरुआला प्रादेशिक रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं.

Cricketer dies
पृथ्वी शॉ-आकृती अग्रवालचं बिनसलं? साखरपुड्याचे फोटो डिलीट करत केलं एकमेकांना 'अनफॉलो'

झुल्फिकारच्या मृत्यूचं नेमकं कारण अजून समोर आलेलं नाही. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे श्रीलंकेतील क्रिकेट वर्तुळात शोककळा पसरलीये. तसंच क्रिकेट सामने सुरू असताना खेळाडूंची आरोग्य तपासणी, आपत्कालीन वैद्यकीय सुविधा आणि त्वरित उपचारांची व्यवस्था किती महत्त्वाची आहे, याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झालीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com