पृथ्वी शॉ-आकृती अग्रवालचं बिनसलं? साखरपुड्याचे फोटो डिलीट करत केलं एकमेकांना 'अनफॉलो'

Prithvi Shaw And Aakriti Agrawal Breakup : भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि त्याची मंगेतर आकृती अग्रवाल यांचा या वर्षाच्या मार्चमध्ये साखरपुडा झाला होता. मात्र, आता त्यांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा आहे.
Prithvi Shaw And Aakriti Agrawal Breakup :
PRITHVI SHAW AND AAKRITI AGRAWAL BREAKUP RUMOURS GROW FOUR MONTHS AFTER ENGAGEMENTsaam tv
Published On
Summary
  • पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल यांचा मार्च २०२६ मध्ये साखरपुडा झाला होता

  • आकृती अग्रवाल यांच्या सोशल मीडिया पोस्टनंतर दोघांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा

  • दोघांकडूनही ब्रेकअपबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि त्याची होणारी पत्नी आकृती अग्रवाल यांच्यातील बिनसलं असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेला कारण ठरलीय, सोशल मीडियावर आकृतीनं केलेली एक पोस्ट मार्च २०२६ मध्ये आकृती अग्रवाल आणि पृथ्वी शॉ यांचा साखरपुडा झाला होता. पण साखरपुड्याच्या चार महिन्यांतच या दोघांच्या नात्यात दुरावा आलाय. आकृती अग्रवालच्या सोशल मीडिया पोस्ट्स आणि त्यांनी उचललेल्या पावलांमुळे त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलंय. या स्टार जोडप्यांमधील दुराव्यामागील अनेक प्रमुख कारणे आता समोर येत आहेत.

Prithvi Shaw And Aakriti Agrawal Breakup :
ICC Ranking : आयसीसी रँकिंगमध्ये सर्वात मोठा उलटफेर; अभिषेक शर्मानं पहिला नंबर गमावला; टॉप १० मध्ये कोण-कोण?

इन्स्टाग्रामवरून साखरपुड्याचे फोटो हटवले

आकृती अग्रवालने आपल्या सोशल मीडिया साईटवरून पृथ्वी शॉ आणि तिचे फोटो हटवले आहेत. पृथ्वी शॉसोबतचे सर्व फोटो आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हटवल्यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. इतकेच नाही तर तिने आपल्या प्रोफाईलवरून साखरपुड्याचे फोटोही डिलिट केले आहेत. आकृतीने इन्स्टाग्रामवर पृथ्वी शॉला 'अनफॉलो' देखील केले आहे. दोघांनी एकमेकांना 'अनफॉलो' केल्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Prithvi Shaw And Aakriti Agrawal Breakup :
Hardik Pandya : हार्दिक पंड्यानं सोडली मुंबई, करिअरसाठी सर्वात मोठा निर्णय; आता कुठे शिफ्ट झाला?

सोशल मीडियावरील स्टोरीमध्ये गंभीर आरोप

सोशल मीडियावर इन्स्टाग्राम स्टोरीचा एक स्क्रीनशॉटही व्हायरल होतोय. आकृती अग्रवालने काही तासांनंतर ती स्टोरी डिलीट केल्याचं देखील म्हटलं जातंय. इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या एका स्टोरीमध्ये तिने काय म्हटलंय, "माझी अनेकदा फसवणूक झाली, तरीही मी एक शब्दही उच्चारला नाही.

आयुष्यात पुढे जाऊनही, सोशल मीडियावर पसरणाऱ्या प्रत्येक अफवा आणि चर्चा पूर्णपणे सत्य आहेत, यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये." आणखी एका फोटोसोबत तिने लिहिले, "ते नेहमीच खोटे बोलणार." मात्र, या संपूर्ण वादाबाबत दोन्हीपैकी कोणत्याही बाजूकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com