World Cup मध्ये फ्लॉप, लाजिरवाणा पराभव; सरकारनं अख्खा क्रिकेट बोर्डच केला बरखास्त

Sri Lanka Cricket Board : वर्ल्डकप २०२३ मध्ये श्रीलंका संघाच्या खराब कामगिरीमुळं सरकारनं मोठी कारवाई केली आहे.
Sri Lanka Cricket Board, India vs Sri Lanka (BCCI/X)
Sri Lanka Cricket Board, India vs Sri Lanka (BCCI/X) SAAM TV
Published On

World Cup 2023, Sri Lanka Cricket Board :

वर्ल्डकप २०२३ मध्ये श्रीलंका संघाच्या खराब कामगिरीमुळं सरकारनं मोठी कारवाई केली आहे. सरकारनं श्रीलंका क्रिकेट बोर्डच बरखास्त केला आहे. क्रीडा मंत्रालयानं ही माहिती दिली.

वर्ल्डकपमध्ये श्रीलंका संघानं (Sri Lanka Cricket Team) आतापर्यंत सात सामने खेळले असून, त्यापैकी पाच सामन्यांत पराभव झाला आहे. त्यांना फक्त दोन सामन्यांत विजय मिळवता आलाय. हा संघ सेमिफायनलच्या (Semi Final) शर्यतीतून जवळजवळ बाहेर झाला आहे. (Latest sports updates)

मागील सामन्यात श्रीलंकेला भारतानं (India Vs Sri Lanka) तब्बल ३०२ धावांनी पराभूत केलं होतं. त्यानंतर ही सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. क्रीडा मंत्रालयानं तर निवड समितीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

श्रीलंकेचा क्रिकेट बोर्ड देशद्रोही आणि भ्रष्ट असल्याचा खळबळजनक आरोप याआधी क्रीडा मंत्री रोशन रणसिंघे यांनी केला होता. बोर्डाच्या सदस्यांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली होती. त्यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे सचिव मोहन डी सिल्व्हा यांनी शनिवारी पदाचा राजीनामा दिला. तिथल्या क्रिकेट चाहत्यांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली होती.

क्रीडा मंत्र्यांच्या कार्यालयातून सोमवारी एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं. श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या उर्वरित सदस्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. वर्ल्डकप विजेत्या संघाचा कर्णधार माजी क्रिकेटपटू अर्जुन रणतुंगा यांच्या अध्यक्षतेखाली एक अंतरिम समितीची नेमली आहे, असे त्यात नमूद करण्यात आले. ७ सदस्यांच्या समितीत रणतुंगासह सुप्रीम कोर्टाचे दोन निवृत्त न्यायाधीश देखील असतील.

Sri Lanka Cricket Board, India vs Sri Lanka (BCCI/X)
IND vs SA: 'आम्हाला आधीच माहीत होतं...', लाजीरवाण्या पराभवानंतर टेम्बा बावुमाच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष

श्रीलंका संघ सध्या वर्ल्डकप २०२३ च्या गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे. सोमवारी त्यांचा सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. हा सामना जिंकून श्रीलंका २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.

Sri Lanka Cricket Board, India vs Sri Lanka (BCCI/X)
World Cup 2023: न्यूझीलंड जिंकूनही पाकिस्तानला मिळणार सेमीफायनलचं तिकीट! वाचा कसं असेल समीकरण

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com