Viral Video: स्पिनर की पेसर? कुलदीपने टाकला आतापर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू! रोहितची मजेशीर रिॲक्शन व्हायरल

Kuldeep Yadav Bowling Viral Video: कुलदीप यादवचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Kuldeep Yadav Bowling Viral Video
Kuldeep Yadav Bowling Viral Videotwitter
Published On: 

Kuldeep Yadav Bowling Viral Video:

भारतीय संघाने वर्ल्डकपर २०२३ स्पर्धेत इतिहास घडवला आहे. तब्बल २० वर्षांनंतर भारतीय संघाने न्यूझीलंडवर विजय मिळवला आहे. या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी २७४ धावांची गरज होती.

या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने ४ गडी राखून विजय मिळवला. मोहम्मद शमी आणि विराट कोहली विजयाचे हिरो ठरले आहेत. दरम्यान या सामन्यात असं काही घडलं ज्यामुळे कर्णधार रोहित शर्माला हसू आवरलं नाही.

भारतीय संघातील फिरकीपटू कुलदीप यादव हा चायनामॅन गोलंदाज आहे. या डावात त्याने असा काही चेंडू टाकला जो पाहून फलंदाज देखील आश्चर्यचकीत झाला. तर झाले असे की, कुलदीप यादव ३३ वे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला होता.

या षटकातील चौथा चेंडु त्याने न फिरवता सरळ सीमने फेकला. या चेंडूची गती इतकी होती की, फलंदाजाने शॉट मारणं तर दुर बॉलला बॅटचा स्पर्शही झाला नाही.

स्पीडोमीटरवर या चेंडूची गती ताशी ११३.४ किमी इतकी होती. या चेंडू पाहून कर्णधार रोहित शर्मालाही हसू आवरलं नाही. तो खुप वेळ हसतच राहिला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

मोहम्मद शमीच्या पाच विकेट्स..

मोहम्मद शमी या डावात भारतीय संघासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. या सामन्यात त्याने न्यूझीलंडच्या ५ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाद दाखवली आहे. हा वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील भारतीय संघाचा पाचवा सामना होता. (Latest sports updates)

Kuldeep Yadav Bowling Viral Video
IND vs NZ: फिल्डिंग कोचचा नवा अविष्कार! मोठ्या स्क्रीनवर नव्हे तर हटके पद्धतीने केली बेस्ट फिल्डरची घोषणा; Video

यापूर्वी झालेल्या ४ सामन्यांमध्ये मोहम्मद शमीला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं गेलं नव्हतं. न्यूझीलंडविरूद्ध झालेल्या सामन्यात शार्दुल ठाकुरला विश्रांती दिली गेली होती.

त्याच्याऐवजी मोहम्मद शमीचा संघात समावेश करण्यात आला. या संधीचा पुरेपूर फायदा घेत ५ गडी बाद केले. त्याने या डावात १० षटके गोलंदाजी करून ५४ धावा खर्च करत ५ गडी बाद केल्या.

Kuldeep Yadav Bowling Viral Video
IND vs NZ: विश्वासच बसेना..! जडेजाने सोपा झेल सोडल्यानंतर बायकोला आश्चर्याचा धक्का; दिलेली रिॲक्शन होतेय व्हायरल, Video

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com