सौरव गांगुलीवर मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी; IPL 2027 साठी दिल्ली कॅपिटल्सची घोषणा

sourav ganguly named delhi capitals head coach for ipl 2027 : आयपीएल २०२७ साठी दिल्ली कॅपिटल्सने भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचं मुख्य प्रशिक्षकपद गांगुलीला दिलं आहे.
सौरव गांगुली दिल्ली कॅपिटल्सचा नवा कोच
सौरव गांगुली दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. saam tv
Published On: 

who is the new head coach of Delhi Capitals for IPL 2027 : भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार आणि क्रिकेटच्या विश्वात 'दादा' म्हणून ओळख असलेल्या सौरव गांगुलीवर आयपीएल २०२७ साठी मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गांगुली हा दिल्ली कॅपिटल्स संघाचं मुख्य प्रशिक्षकपद भूषवणार आहे. दिल्ली कॅपिटल्स संघानं सोशल मीडियावर ही माहिती दिली.

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघानं सोशल मीडियावर सौरव गांगुलीचा एक व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांना ही माहिती दिली आहे. दिल्ली, आता दादागिरीची वेळ आहे, असं कॅप्शनमध्ये म्हटलंय. दिल्ली कॅपिटल्सनं सोमवारीच कोचिंग स्टाफ बदलाचे संकेत दिले होते. गांगुली आता हेमंग बदानी याची जागा घेणार आहे. २०२५ आणि २०२६ च्या पर्वामध्ये बदानी दिल्ली संघाचा प्रशिक्षक होता.

दिल्ली कॅपिटल्सच्या कोचिंग स्टाफमध्ये माजी क्रिकेटपटू हेमंग बदानी मुख्य प्रशिक्षक, वेणुगोपाल राव क्रिकेट संचालक, मुनाफ पटेल हा गोलंदाजी प्रशिक्षक, तर सहायक प्रशिक्षक म्हणून इयान बेल, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून जॉन मुनी यांचा समावेश होता. आता पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेसाठी दिल्ली संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये बदल करण्यात आला आहे.

सौरव गांगुली हा २०१९ मध्ये पहिल्यांदाच दिल्ली कॅपिटल्स संघाचा सल्लागार म्हणून काम करत होता. त्यावेळी सौरव हा सीएबीचा अध्यक्ष होता. त्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्षपदही भूषवले. गांगुलीने यावर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेच्या एसए २० लीगमध्ये प्रिटोरिया कॅपिटल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली होती. मुख्य प्रशिक्षक म्हणून हा त्याचा पहिलाच अनुभव होता. तसेच महिला प्रिमिअर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघासोबतही तो काम करणार आहे.

युवराज सिंगची होणार एन्ट्री

रिपोर्ट्सनुसार, दिल्ली कॅपिटल्सच्या कोचिंग स्टाफमध्ये युवराज सिंगची सुद्धा एन्ट्री होण्याची शक्यता आहे. युवराज सिंगने भारतीय संघात असलेल्या अनेक खेळाडूंना घडवलं आहे. पण आता दिल्लीच्या कोचिंग स्टाफमध्ये दिसण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या फलंदाजी प्रशिक्षकपदाची त्याला जबाबदारी मिळू शकते. अभिषेक शर्मा, शुभमन गिल यांच्यासारखे खेळाडू घडवण्यात त्याचा वाटा मोठा आहे. सध्या हे दोन्ही खेळाडू भारतीय संघासाठी दमदार कामगिरी करत आहेत.

सौरव गांगुली दिल्ली कॅपिटल्सचा नवा कोच
Harmanpreet Kaur: हरमनप्रीत कौरने टीम इंडियाचं कर्णधारपद सोडलं; भावुक पोस्ट करत दिली माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com