Team India: टीम इंडिया प्रॅक्टिस करत असतानाच मैदानात घुसला साप; खेळाडू झाले सुन्न

Snake Enters Cricket Field: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या सराव सत्रात एक अविश्वसनीय घटना घडली.
Team India
Team Indiasaam tv
Published On

महिला क्रिकेट वर्ल्डकपला सुरुवात झाली आहे. यासाठी टीम इंडिया सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर असून उद्या भारत विरूद्ध पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. दरम्यान पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी एका अनपेक्षित घटनेने सर्वांचे लक्ष वेधलं. शुक्रवारी संध्याकाळी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये टीम इंडियाचा सराव सुरू असताना मैदानावर अचानक एक साप शिरल्याने काही क्षण गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.

सरावादरम्यान मैदानावर आला साप

टीम इंडियाचा सराव सत्र सुरू असताना स्टेडियममधील नाल्यांतून सरपटत एक साप थेट मैदानावर आला. हा प्रसंग पाहून खेळाडू, सहाय्यक कर्मचारी आणि माध्यम प्रतिनिधी क्षणभर थबकले. त्यानंतर लगेच स्टेडियम कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केलं की, हा विषारी साप नसून ‘गरंडिया’ नावाच्या स्थानिक प्रजातीचा साप आहे. हा साप प्रामुख्याने उंदीर शोधण्यासाठी मैदान किंवा नाल्यांमध्ये फिरतो. यामुळे माणसाला कोणताही धोका नसतो.

Team India
IND vs AUS: रोहित शर्माचं वनडेतील कर्णधारपद धोक्यात? ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी आज होणार टीम इंडियाची घोषणा

ही घटना तेव्हा घडली जेव्हा भारतीय खेळाडू नेट्सकडे जात होत्या. साप मैदानात शिरल्याचं दिसताच सर्वांनी त्याच्यापासून थोडं अंतर राखलं. मात्र टीमची कर्णधार हरमनप्रीत कौरसह खेळाडूंनी घाबरण्याऐवजी उत्सुकतेने तो प्रसंग पाहिला. स्टेडियममधील एका कर्मचाऱ्याने सांगितलं की, अशा घटना या ठिकाणी नव्या नाहीत. श्रीलंका प्रीमियर लीग आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांदरम्यानही अशा वेळा मैदानात साप दिसले आहेत.

Team India
Ind vs WI Highlights : धावांचा पाऊस! ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजाची शतके; टीम इंडिया भक्कम स्थितीत, वेस्ट इंडीजवर पराभवाचे ढग

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वीची चर्चा

भारतीय महिला टीम रविवारी पाकिस्तानविरुद्ध आपला दुसरा ग्रुप स्टेजमधील सामना खेळणार आहे. याआधी भारताने आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात करत श्रीलंकेवर विजय मिळवला होता.

Team India
IND vs WI: मोहम्मद सिराजने स्टार्कला टाकलं मागे; 'अशी' कामगिरी करणारा बनला जगातला पहिला गोलंदाज

कमेंट्रीतील विधानामुळे निर्माण झाला वाद

दरम्यान, पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यातील सामन्यादरम्यान कमेंट्रीमध्येही एक नवीन वाद उभा राहिला. पाकिस्तानच्या माजी कर्णधार आणि कॉमेंट्रीटर सना मीर यांनी थेट प्रसारणात “आझाद काश्मीर” हा शब्द वापरला. आयसीसीच्या नियमानुसार, खेळादरम्यान राजकीय विधानं किंवा वादग्रस्त शब्दांचा वापर पूर्णपणे बंदी आहे. या वक्तव्यावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि अनेक क्रिकेट चाहत्यांनी मीर यांच्या विधानाची तीव्र टीका केली.

Team India
IND vs WI Day-1 Highlights: आधी सिराज अन् बुमराहनं कंबरडं मोडलं, नंतर राहुलनं कुटलं; वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या दिवशी भारताचं पारडं जड

भारत-पाकिस्तान सामन्यावर सर्वांचं लक्ष

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नेहमीच हाय व्होल्टेज मानला जातो. या वेळीही कोलंबोमध्ये होणाऱ्या सामन्याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्साह ओसंडून वाहतोय. बांग्लादेशाकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानवर दबाव असेल तर भारत आपला विजयी प्रवास कायम ठेवण्यासाठी उतरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com