SAFF Championship Final 2023: भारतीय संघाचा ऐतिहासिक कारनामा! नवव्यांदा SAFF चॅम्पियनशिप जिंकत रचला इतिहास

India vs Kuwait SAFF Championship Final: भारत आणि कुवैत या दोन्ही संघांमध्ये SAFF Championship 2023 स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला.
saff cup
saff cup saam tv
Published On: 

India vs Kuwait: भारत आणि कुवैत या दोन्ही संघांमध्ये SAFF Championship 2023 स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये बरोबरीची लढत पाहायला मिळाली.

हाल्फ टाईमपर्यंत हा सामना 1-1 च्या बरोबरीत होता. तर पेनल्टी शूट आऊटने सामन्याचा निकाल लागला. सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने पेनल्टी शूट आऊटमध्ये बाजी मारली आणि 5-4 ने जेतेपदाला गवसणी घातली.

यासह भारतीय संघाने नवव्यांदा या स्पर्धेच्या जेतेपद पटकावले आहे. यापूर्वी भारतीय संघाने 1993, 1997, 1999, 2005, 2009, 2011, 2015, 2021 मध्ये या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. (India vs Kuwait)

saff cup
Sunil Chhetri Retirement: सुनील छेत्रीने दिले निवृत्तीचे संकेत? सांगितलं केव्हा खेळणार अंतिम सामना..

भारतीय संघाचा जोरदार विजय..

भारतीय संघाने कुवैतला पेनल्टी शूट आऊटमध्ये 5-4 ने पराभूत करत जेतेपद पटकावले आहे. गोलकीपर गुरप्रित संधू या विजयाचा हिरो ठरला आहे. त्याने पेनल्टी शूट आऊटमध्ये गोल सेव्ह करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

हा सामना 1-1 च्या बरोबरीत समाप्त झाला होता. शेवटी गोलकीपर गुरप्रित संधू भिंतीसारखा अडून उभा राहिला. (Latest sports updates)

दोन्ही संघांना या सामन्यात 1-1 गोल करता आले होते. शेवटी सामना एक्स्ट्रा टाईममध्ये गेला. या सामन्यात कुवैतचा दबदबा पाहायला मिळाला. सामन्यातील 14 व्या मिनिटाला अब्दुल्ला अलबलूशीने गोल करत कुवैतला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भारतीय संघाने हल्लाबोल करायला सुरुवात केली.

भारतीय संघाकडून लल्लियानज़ुआला चांगटे (Lallianzuala Chhangte) 39 व्या मिनिटाला गोल करून भारतीय संघाला कमबॅक करून दिलं.

या सामन्यानंतर गुरप्रित संधू म्हणाला की, 'मला असं वाटतं की, आम्ही खरंच चांगली कामगिरी केली आहे. एक गोलने मागे असून सुद्धा संघाने माघार घेतली नाही. याचं श्रेय संपूर्ण संघाला जातं. पेनल्टीमध्ये विजय मिळवणं हे आपलं नशीब किती चांगलं आहे यावर अवलंबून असतं. आज आमचं नशीब चांगलं होतं.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.