Prime Volleyball League: तिसऱ्या रूपे प्राईम व्हॉलिबॉल लीग स्पर्धेत हैदराबाद ब्लॅक हॉक्सची मुंबई मेटीयॉर्सवर मात

Prime Volleyball League: तिसऱ्या रूपे प्राईम व्हॉलिबॉल लीग स्पर्धेत हैदराबाद ब्लॅक हॉक्स संघाने मुंबई मेटीयॉर्स संघाचा 7-15, 12-15, 15-10, 15-11, 20-18 असा पराभव करून विजयी सलामी दिली आहे.
Prime Volleyball League
Prime Volleyball Leaguesaam tv news
Published On

Prime Volleyball League:

तिसऱ्या रूपे प्राईम व्हॉलिबॉल लीग स्पर्धेत हैदराबाद ब्लॅक हॉक्स संघाने मुंबई मेटीयॉर्स संघाचा 7-15, 12-15, 15-10, 15-11, 20-18 असा पराभव करून विजयी सलामी दिली आहे.

ए 23 प्रायोजित ही स्पर्धा जवाहरलाल नेहरू इंडोर स्टेडियम येथे सुरू आहे. या स्पर्धेत आश्मत उल्हाह या सामन्यातील विजयाचा मानकरी ठरला आहे. या सामन्याला तामिळनाडू राज्याच्या युवक कल्याण आणि क्रीडा विकास मंत्री उधयानिधी स्टॅलिन यांनी देखील आपली उपस्थिती लावली होती.

मुंबईच्या अमित गुलियाने सुरेख सुरुवात करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर हैदराबादच्या सुजन एमव्हीने सुरेख खेळ करून संघाला बरोबरी साधून दिली. मुंबईच्या शुभम चौधरीने आक्रमक खेळ करत संघाला बरोबरी साधून देण्याचा प्रयत्न केला.

हेमंत आणि स्टीफन कोवासेविकच्या आक्रमक खेळाच्या जोरावर हैदराबाद संघाने तिसऱ्या सेटमध्ये आघाडी प्राप्त करून दिली. त्यानंतर मुंबईच्या अमित, अजित लाल व शुभम यांनी चुरस देत संघाला बरोबरी साधून देण्याचा प्रयत्न केला. (sports news in marathi)

Prime Volleyball League
IND vs ENG 4th Test: रांची कसोटीतून रजत पाटीदारची होणार सुट्टी! हा प्रमुख खेळाडू करतोय कमबॅक

हैदराबादचे आक्रमण मुंबईच्या शमीनने थोपवून लावले. मुंबईने सर्व्हिसमध्ये केलेल्या चुकांचा फायदा घेत आश्मत उल्हाहने हैदराबाद संघाला चौथ्या गेममध्ये 15-11 असा विजय मिळवून देत संघाची आघाडी अधिक भक्कम केली.

पाचव्या सेटमध्ये हैदराबाद संघामध्ये आपले आक्रमण कायम ठेवत हा सेट 20-18 असा जिंकून सामन्यात विजय मिळवला.

Prime Volleyball League
Ind vs Eng 4th Test: भारत - इंग्लंड कसोटी मालिकेतील चौथा सामना केव्हा अन् कुठे रंगणार? जाणून घ्या A to Z माहिती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com