World Cup 2023: रोहित -विराटचा व्हिडिओ पाहून चाहत्यांना धक्का! न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात मैदानात नेमकं काय घडलं?

Virat Kohli- Rohit Sharma Viral Video: या सामन्यानंतर आयसीसीने एक व्हिडिओ शेअर केला आहे.
Virat Kohli- Rohit Sharma Viral Video:
Virat Kohli- Rohit Sharma Viral Video:saam tv news
Published On

Virat Kohli- Rohit Sharma Viral Video:

भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील २१ व्या सामन्यात आमने सामने आले होते. धरमशाळेच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडवर ४ गडी राखून विजय मिळवला आहे.

तब्बल २० वर्षांनंतर वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव केला आहे. मोहम्मद शमी आणि विराट कोहली हे दोघेही या सामन्याचे हिरो ठरले आहेत.

या सामन्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्माचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा

विराट आणि रोहितमध्ये वाद?

या सामन्यानंतर आयसीसीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पहिल्या डावातील असल्याचं दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, विराट रोहितला काहितरी बोलताना दिसून येत आहे.

विराटचं बोलणं ऐकून रोहित शांतच झाला. दोघांमध्ये बराच वेळ चर्चा सुरू होती. व्हिडिओमध्ये असं दिसून येत आहे की, विराट रोहितला फिल्डिंगमधल्या बदलांबद्दल बोलताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. (Latest sports updates)

शमी, विराट ठरले सामन्याचे हिरो..

या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम गोलंदाजी करताना भारतीय संघाकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक ५ गडी बाद केले. गेल्या ४ सामन्यांमध्ये मोहम्मद शमीला खेळण्याची संधी मिळाली नव्हती.

न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात शार्दुल ठाकुरला विश्रांती देण्यात आली. त्याच्याऐवजी शमीचा संघात समावेश करण्यात आला. त्याने या सामन्यात १० षटकात ५४ धावा खर्च करत ५ गडी बाद केले. न्यूझीलंडचा संपूर्ण डाव २७३ धावांवर संपुष्टात आला.

Virat Kohli- Rohit Sharma Viral Video:
IND vs NZ: फिल्डिंग कोचचा नवा अविष्कार! मोठ्या स्क्रीनवर नव्हे तर हटके पद्धतीने केली बेस्ट फिल्डरची घोषणा; Video

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २७४ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून विराट कोहलीने सर्वाधिक ९५ धावांची खेळी केली. तर कर्णधार रोहित शर्माने ४६ धावांचे योगदान दिले. विराट कोहलीला मोलाची साथ देत रविंद्र जडेजाने नाबाद ३९ धावांची खेळी केली.

Virat Kohli- Rohit Sharma Viral Video:
IND vs NZ: विश्वासच बसेना..! जडेजाने सोपा झेल सोडल्यानंतर बायकोला आश्चर्याचा धक्का; दिलेली रिॲक्शन होतेय व्हायरल, Video

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com