Rohit Sharma Fitness : रोहित शर्मा वनडे मालिका खेळणार का? फिटनेसबाबत मोठी अपडेट

Rohit Sharma passes fitness test : अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेआधी रोहित शर्माच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट आली आहे. रोहित शर्मा फिटनेस टेस्ट पास झाला असून, तो मैदानात खेळण्यासाठी उतरणार आहे.
रोहित शर्माच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट
Rohit Sharma Fitness Updatesaam tv
Published On

भारत आणि अफगाणिस्तान (India Vs Afghanistan) यांच्यातील एकमेव कसोटी सामना अवघ्या अडीच दिवसांतच संपला. भारतानं एक डाव राखून ऐतिहासिक विजय मिळवला. आता दोन्ही संघांमध्ये वनडे मालिका होणार आहे. १३ जूनपासून मालिकेला सुरुवात होईल. त्याआधीच रोहित शर्माच्या फिटनेसबाबत महत्वाची अपडेट आली आहे. रोहित शर्मा वनडे मालिकेत खेळणार का? तो फिट आहे का? या सर्व प्रश्नार्थक चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी (ODI series) निवडलेल्या संघात माजी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला स्थान देण्यात आले होते. मात्र, तो खेळणार की नाही हे फिटनेसवर अवलंबून होते. विराट कोहलीनंतर रोहितही मैदानात खेळताना दिसणार नाही अशी चर्चा सुरू झाली होती. या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. रोहितच्या फिटनेसबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.

बेंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेन्समध्ये रोहित शर्मा फिटनेसच्या कसोटीवर खरा उतरला आहे. तो पूर्णपणे फिट असल्यानं अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळण्याचा त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तत्पूर्वी, अधिकृत क्लीअरन्स मिळण्यासाठी एका दिवसाचा अवधी लागू शकतो, असं सांगितलं जातं. सूत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, रोहित शर्मा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळं सीओईमध्ये होता. तपासणीनंतर त्याला खेळण्याची परवानगी मिळाली आहे. रोहित शर्मा लवकरच संघ सहकाऱ्यांसोबत सरावाला जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. रोहितसोबत हार्दिक पंड्याही वनडे मालिकेत खेळताना दिसणार आहे.

रोहित शर्माच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट
Suryakumar Yadav: टीम इंडियातून काढल्यानंतर सूर्या कोपला! 200 च्या स्ट्राइक रेटनं गोलंदाजांची काढली पिसे

रोहित शर्मा हा आयपीएल २०२६ मध्ये जायबंदी झाला होता. त्यामुळे मुंबई इंडियन्सकडून तो ५ सामने खेळू शकला नव्हता. त्यानं कमबॅक केलं, पण एकाच सामन्यात त्याला मोठी खेळी साकारता आली. आयपीएल पर्वाच्या अखेरच्या सामन्यात तर त्याला भोपळाही फोडता आला नव्हता. आता जवळपास तीन आठवड्यांनी तो मैदानावर दिसणार आहे. भारत-अफगाणिस्तान यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना धर्मशालामध्ये होणार आहे.

अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय संघ -

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पंड्या, नीतीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव, गुरनूर बरार, हर्ष दुबे.

रोहित शर्माच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट
Team India : आयर्लंड, इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियात अचानक बदल; कुणाला विश्रांती, कुणाला मिळाली संधी?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com