भारतीय क्रिकेट संघचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला टी२० वर्ल्ड कपच्या संघाचा भाग व्हायचं आहे. दोन्ही खेळाडूंना संघाबाहेर ठेवता येणार नाहीये. परंतु हे दोन्ही खेळाडू नोव्हेंबर २०२२ मध्ये झालेल्या टी२० विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यानंतर अशा स्वरुपाचे सामने खेळलेले नाहीत. या कारणामुळे यांची निवड होणार का नाही हे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Latest News)
दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध ३ सामन्यांची टी-२० मालिका (T-20 series) खेळणार आहे. या दौऱ्यासाठी अद्याप संघाची निवड करण्यात आलेली नाहीये. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान तिन्ही राष्ट्रीय संघ निवडकर्ते शिवसुंदर दास, सलिल अंकोला आणि अजित आगरकर आफ्रिकेला पोहोचतील. त्यावेळी आगरकर भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid), कर्णधार (Captain) रोहित शर्मा (Rohit Sharma)आणि विराट कोहलीशी (Virat Kohli) चर्चा करतील. त्यानंतर अफगाणितास्तान दौऱ्यासाठी संघ निवडला जाईल.
टी-२० विश्वचषकापूर्वी (T20 World Cup) टीम इंडियाची(Team India) ही शेवटची टी-२० मालिका असेल. २०२४च्या टी-२० वर्ल्ड कपमध्येही रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) नसल्याचा दावा केला जात होता. परंतु हाती आलेल्या माहितीनुसार, या दोघांना टी२० वर्ल्डकपच्या संघाचा भाग होऊन देशाचं प्रतिनिधीत्व करायचं आहे. सध्या टीम इंडिया एकापेक्षा एक स्टार खेळाडूंनी भरलेली आहे, यामुळे यात कोणाचा नंबर लागेल हे सांगता येत नाही. यामुळे संघ निवडकर्ते आयपीएलच्या (IPL) सामन्यामध्ये ३० खेळांडूवर नजर ठेवून असणार आहेत.
आगरकर आणि त्याचे सहकारी सुमारे ३० खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष ठेवून असतील. टी२० विश्वचषकापूर्वी इंडियन प्रीमियर लीग (IPL) चे सामने होणार आहेत. या आयपीएल सामन्यादरम्यान रोहित आणि विराट कोहलीच्या फिटनेटसवर लक्ष ठेवले जाणार आहे, त्यावरच त्यांची निवड केली जाणार आहे.
भारतीय क्रिकेट बोर्डाच्या सुत्राने सांगितलं की, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या फिट नाहीत.पण अफगाणिस्ताच्या विरुद्धात होणाऱ्या मालिकांच्या आधी कोणताच अंदाज लावला जाऊ शकत नाही. सर्व काही आयपीएलमधील कामगिरी पाहूनच हा निर्णय घेतला जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.