INDW vs AUSW: भारताचा दारुण पराभव, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीपुढे टीम इंडियाची महिला ब्रिगेड १४८ धावांवर ढेर

INDW vs AUSW Cricket Match: ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाने तिसरा सामनाही गमावला आहे. ऑस्ट्रेलियाने १९० धावांनी टीम इंडियावर विजय मिळवला आहे
INDW vs AUSW:
INDW vs AUSW: ICC TWITTER
Published On

INDW vs AUSW:

ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाने तिसरा सामनाही गमावला आहे. ऑस्ट्रेलियाने १९० धावांनी टीम इंडियावर विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीपुढे टीम इंडियाचे फलंदाज अवघ्या १४८ धावांवर गारद झाले. यामुळे टीम इंडियाला लाजीरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. (Latest Marathi News)

ऑस्ट्रेलियाने ५० षटकात ७ गडी गमावून ३३८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची महिला ब्रिगेड ३२.४ षटकात १४८ धावांवर गारद झाली. टीम इंडियाचे सहा खेळाडू दहा धावांच्या आतच बाद झाले.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

INDW vs AUSW:
David Warner: अखेरच्या कसोटी सामन्यापूर्वी वॉर्नरला धक्का; मुलींच्या भेटवस्तू असलेली बॅकपॅक चोरट्यांनी पळवली

टीम इंडियासाठी स्मृती मंधानाने २९, जेमिमाने २५ , दीप्ती शर्माने नाबाद २५ धावा केल्या. टीम इंडियाचे इतर खेळाडूंना फारशी चमक दाखवता आली नाही.

INDW vs AUSW:
Ind vs SA Test Match: नव्या वर्षात टीम इंडियात होणार मोठा बदल; रोहित शर्मा घेणार कठोर निर्णय

ऑस्ट्रेलियासाठी जॉर्जियाने तीन गडी बाद केले. मेगन , एनाबेल आणि अलानाने प्रत्येकी दोन-दोन गडी बाद केले. ऑस्ट्रेलियासाठी सलामीवीर फोएबेने ११९ धावा केल्या. या डावात १६ चौकार आणि १ षटाकाराचा सामावेश आहे.

ऑस्ट्रिलियाने जिंकली मालिका

ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिकेत तिसरा सामनाही भारताने गमावला. ऑस्ट्रेलियाने १९० धावांनी सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाने ३-० ने मालिका जिंकली. या सामन्यात दीप्तीने नाबाद २५ धावा केल्या. पूजा वस्राकर स्वस्तात माघारी परतली. पूजाने १४ चेंडूत १४ धावा केल्या. सदरलँडने ३० व्या षटकात २ गडी बाद केले. श्रेयंका पाटील , रेणुका सिंह ठाकूरला बाद केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com