Hardik Pandya Fitness: आयपीएलच्या आधीच मुंबई इंडियन्ससाठी खुशखबर; हार्दिकने मॅनेजमेंटची डोकेदुखी केली दूर

Hardik Pandya Fitness update: यंदाच्या आयपीएलच्या हंगामासाठी काही खेळाडूंचा लिलाव देखील झाला आहे. याचदरम्यान, ५ वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी खुशखबर हाती आली आहे.
Hardik Pandya
Hardik Pandya Saam Digital
Published On

Hardik Pandya Fitness, ipl Team MI 2024:

इंडियन प्रीमियर लीग २०२४ हंगामाची क्रिकेट चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत. यंदाच्या आयपीएल हंगामाची तयारी सुरु करण्यात आली आहे. काही खेळाडूंचा लिलाव देखील झाला आहे. याचदरम्यान, ५ वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी खुशखबर हाती आली आहे. (Latest Marathi News)

'आज तक'च्या वृत्तानुसार, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या घोट्याला दुखापत झाल्याने क्रिकेटपासून दूर आहे. यामुळे काही दिवसांपूर्वी हार्दिक पंड्या आयपीएल स्पर्धा खेळणार नाही, असं वृत्त आलं होतं . मात्र, आता हार्दिक पंड्या फिट झाल्याचं वृत्त हाती आलं आहे. हार्दिकचा दुखापतग्रस्त घोटा पूर्णपणे ठीक झाला आहे. तो आता रोज सराव करत असल्याची माहिती मिळाली आहे.

Hardik Pandya
Sakshi Malik: साक्षी मलिक निवृत्तीचा निर्णय घेणार मागे? राष्ट्रीय कुस्ती महासंघ बरखास्त झाल्यानंतर दिली पहिली प्रतिक्रिया

हार्दिक पंड्या आयपीएलसाठी फिट?

भारतीय संघ पुढील वर्षी म्हणजे ११ जानेवारी घरच्याच मैदानात ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. हार्दिक पंड्या या मालिकेत नेतृत्वही करताना दिसू शकतो. या मालिकेनंतर मार्च आणि मे महिन्यादरम्यान आयएपीएलचा हंगाम होणार आहे.

त्यामुळे या हंगामात पंड्या मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंड्या आयपीएलच्या हंगामात खेळणार नाही, ही केवळ अफवा आहे. आयपीएलच्या हंगामासाठी केवळ ४ महिने उरले आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विश्वचषकादरम्यान हार्दिक पंड्या झाला दुखापतग्रस्त

विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशच्या विरोधात खेळताना हार्दिक पंड्या जखमी झाला. यानंतर हार्दिक पंड्या विश्वचषक स्पर्धेतून बाहेर झाला होता. पंड्या दुखापतग्रस्त असल्याने दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरही गेला नव्हता. मात्र, हार्दिक पंड्या सोशल मीडियावर सक्रिय असतो. काही दिवसांपूर्वीच हार्दिक पंड्याचा इन्स्टाग्रामवर दोन व्हिडिओ शेअर केले होते. या व्हिडिओत पंड्या हा व्यायाम आणि मुलासोबत मस्ती करताना दिसत आहे.

Hardik Pandya
Suryakumar Yadav: 'मेरी एक टांग नकली...' जखमी सूर्यकुमारची हटके पोस्ट; चाहत्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया; पाहा VIDEO

मुंबई इंडियन्ससाठी हार्दिक पंड्याने आतापर्यंत मोलाची भूमिका निभावली आहे. मुंबईने हार्दिकला २०१५ साली १० लाख रुपयांत खरेदी केलं होतं. हार्दिकने 2015, 2017, 2019 आणि 2020 सालच्या आयपीएल हंगामात खेळला होता. हार्दिकने २०२१ पर्यंत मुंबईला साथ दिली होती. त्यानंतर २०२२ साली लिलावात मुंबई रिलीज केलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com