ICC T20 World Cup 2024: रिषभ पंत टी-२० वर्ल्डकप खेळणार! या खेळाडूंनाही मिळू शकते संधी

Rishabh Pant In T20 World Cup 2024: आयपीएल २०२४ स्पर्धा सुरु असताना टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड केली जाणार आहे.
Rishabh Pant is set to be included in the Indian team for the T20I World Cup 2024 says reports amd2000
Rishabh Pant is set to be included in the Indian team for the T20I World Cup 2024 says reports amd2000yandex

Rishabh Pant For T20 World Cup 2024:

सध्या भारतात आयपीएल २०२४ स्पर्धेचा थरार सुरु आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर १ जूनपासून वेस्टइंडिज आणि अमेरिकेत आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. दरम्यान भारतीय संघात स्थान मिळवण्याच्या शर्यतीत रिषभ पंत आघाडीवर असल्याचं पाहायला मिळालं आहे. गेले काही महिने संघाबाहेर असलेल्या रिषभ पंतने आयपीएल २०२४ स्पर्धेतून कमबॅक केलं आहे.

रिषभ पंतचं कमबॅक..

डिसेंबर २०२२ मध्ये रिषभ पंतच्या कारचा अपघात झाला होता.या अपघातामुळे त्याला तब्बल १६ महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहावं लागलं होतं. दुखातीतून सावरल्यानंतर त्याने आयपीएल २०२४ स्पर्धेतून कमबॅक केलं आहे. या हंगामात तो दिल्ली कॅपिटल्स संघाचं नेतृत्व करतोय. या संघाकडून खेळताना त्याने लागोपाठ अर्धशतकं झळकावली आहेत. आतापर्यंत खेळलेल्या ५ सामन्यांमध्ये त्याने १५३ धावा केल्या आहेत.

Rishabh Pant is set to be included in the Indian team for the T20I World Cup 2024 says reports amd2000
IPL 2024 Points Table: चेन्नईच्या विजयानंतर गुणतालिकेचं समीकरण बदललं! तुमचा आवडता संघ कितव्या स्थानी?

रिषभ पंतला भारतीय संघात मिळणार स्थान?

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी रिषभ पंतला भारतीय संघात स्थान दिलं जाणार आहे. रिषभ पंतला भारतीय संघात स्थान मिळणं जवळजवळ निश्चित आहे. या शर्यतीत रिषभ पंतसह आणखी ३ यष्टीरक्षकांचा समावेश आहे ज्यात केएल राहुल, इंग्लंडविरुद्ध शानदार कामगिरी करणारा ध्रुव जुरेल आणि जितेश शर्मा यांचा समावेश आहे.

केएल राहुल आयपीएल स्पर्धेपूर्वी पूर्णपणे फिट नव्हता. त्यामुळे त्याला आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर राहावं लागलं होतं. त्याने आयपीएल स्पर्धेतून कमबॅक तर केलं आहे. मात्र त्याला भारतीय संघात स्थान मिळणार की नाही, हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

Rishabh Pant is set to be included in the Indian team for the T20I World Cup 2024 says reports amd2000
MS Dhoni- Ravindra Jadeja: धोनी फलंदाजीला येण्यापूर्वी मैदानात नेमकं काय घडलं? मजेशीर व्हिडिओ व्हायरल

टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला येत्या १ जूनपासून प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेचा थरार येत्या १ जूनपासून वेस्टइंडिज आणि अमेरिकेत रंगणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंड संघाविरुद्ध रंगणार आहे. तर भारत- पाकिस्तान सामना ९ जून रोजी रंगणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com