MS Dhoni- Ravindra Jadeja: धोनी फलंदाजीला येण्यापूर्वी मैदानात नेमकं काय घडलं? मजेशीर व्हिडिओ व्हायरल
funny moment between ms dhoni and ravindra jadeja during csk vs kkr match video viral amd2000twitter

MS Dhoni- Ravindra Jadeja: धोनी फलंदाजीला येण्यापूर्वी मैदानात नेमकं काय घडलं? मजेशीर व्हिडिओ व्हायरल

MS Dhoni- Ravindra Jadeja Viral Video: चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यादरम्यान झालेल्या सामन्यादरम्यान एमएस धोनी मैदानात येण्यापूर्वी नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

MS Dhoni- Ravindra Jadeja Funny Moment:

चेपॉकच्या मैदानावर खेळताना चेन्नईचाच संघ किंग आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. सोमवारी चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सामना कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुध्द पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने शानदार खेळ करत कोलकाता नाईट रायडर्स संघावर ७ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना एमएस धोनीच्या फलंदाजीचा आनंद घेता आला. दरम्यान धोनी फलंदाजीला येण्यापूर्वी रविंद्र जडेजाने असं काही केलं ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या सामन्यात धावांचा पाठलाग करत असताना चेन्नई सुपर किंग्ज संघाला शिवम दुबेच्या रुपात तिसरा धक्का बसला. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी एमएस धोनी फलंदाजीला आला. या सामन्यात धोनीने ३ चेंडू खेळून १ धाव केली. मात्र तो फलंदाजीला येण्यापूर्वी रविंद्र जडेजाने क्रिकेट चाहत्यांची मजा घेतली. (Cricket news in marathi)

MS Dhoni- Ravindra Jadeja: धोनी फलंदाजीला येण्यापूर्वी मैदानात नेमकं काय घडलं? मजेशीर व्हिडिओ व्हायरल
IPL 2024, PBKS Vs SRH: पंजाब किंग्स हैदराबादला देणार का मात? दोन्ही संघात कोण राहिलंय वरचढ?

ज्यावेळी एमएस धोनी फलंदाजीला येणार होता त्यावेळी रविंद्र जडेजा फलंदाजी करण्यासाठी डग आऊटमधून बाहेर आला. मात्र त्यानंतर लगेचच जडेजा आत गेला आणि धोनी फलंदाजीसाठी बाहेर आला. जडेजाला फलंदाजीसाठी यायचंच नव्हतं. तो केवळ चाहत्यांची फिरकी घेत होता. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

रविंद्र जडेजाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, जेव्हा तो फलंदाजी करण्यासाठी मैदानावर जातो त्यावेळी फॅन्स, तो लवकर बाद व्हावा म्हणून प्रार्थना करतात . कारण क्रिकेट चाहत्यांना एमएस धोनीला फलंदाजी करताना पाहायचं असतं.'

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर चेन्नई सुपर किंग्ज संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला २० षटकअखेर अवघ्या १३८ धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाने ७ गडी राखून शानदार विजय मिळवला.

MS Dhoni- Ravindra Jadeja: धोनी फलंदाजीला येण्यापूर्वी मैदानात नेमकं काय घडलं? मजेशीर व्हिडिओ व्हायरल
IPL 2024 Points Table: चेन्नईच्या विजयानंतर गुणतालिकेचं समीकरण बदललं! तुमचा आवडता संघ कितव्या स्थानी?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com