Virat Kohli - Ishant Sharma: लाईव्ह सामन्यात विराट- इशांत यांच्यात धक्काबुक्की! Video तुफान व्हायरल

Virat kohli- Ishant Sharma Viral Video: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान विराट कोहली आणि इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
rcb vs dc virat kohli and ishant sharma funny sledging in live match video viral
rcb vs dc virat kohli and ishant sharma funny sledging in live match video viral twitter

दिल्ली कॅपिटल्स संघाला धूळ चारत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने आपल्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा अजूनही जिवंत ठेवल्या आहेत. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने शानदार कामगिरी करत दिल्ली कॅपिटल्सवर ४७ धावांनी पराभव केला. दरम्यान या सामन्यातर इशांत शर्मा आणि विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये क्षेत्ररक्षण करत असलेला विराट कोहली फलंदाजी करत असलेल्या इशांत शर्मासोबत मस्ती करताना दिसून येत आहे. नेमकं काय घडलं जाणून घ्या.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या २० सेंकदांच्या व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्ही पाहू शकता की,इशांत शर्माच्या जवळ जाऊन विराट कोहली काहीतरी बोलतो. त्यानंतर तो तिथून निघून जातो. काही मिनिटांनी तो पुन्हा येतो आणि त्याच्या पाठीवर हात ठेऊन काहीतरी बोलतो.

विराट कोहली आणि इशांत शर्मा दोघेही दिल्लीकडून एकत्र खेळले आहेत. त्यामुळे दोघेही खूप चांगले मित्र आहेत. मैदानातील वातावरण तापलं होतं. मात्र हे दोघेही मस्करी करत होते. दोघांच्या या मजेशीर व्हिडिओवर नेटकरी आपल्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.

rcb vs dc virat kohli and ishant sharma funny sledging in live match video viral
Axar Patel Statement: इथंच दिल्लीने सामना गमावला! अक्षर पटेलने सांगितला टर्निंग पॉईंट

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा विजय

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून रजत पाटीदारने सर्वाधिक ५२ धावांची खेळी केली. तर विल जॅक्सने ४१ धावा केल्या. या खेळीच्या बळावर ९ गडी बाद १८७ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघाला १४० धावा करता आल्या. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला ४७ धावांनी गमवावा लागला आहे.

rcb vs dc virat kohli and ishant sharma funny sledging in live match video viral
IPL 2024 Points Table: RCB च्या विजयाने CSKचं टेन्शन वाढलं! पाहा लेटेस्ट पॉईंट्स टेबल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com