
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने १८ वर्षांनंतर आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. आरसीबीने फायनलमध्ये पंजाब किंग्सला ६ धावांनी पराभूत केलं आहे. विराटने ३५ चेंडूत ४३ धावा कुटल्या. बेंगळुरूने दमदार गोलंदाजीच्या जीवावर आयपीएलचा अंतिम सामना जिंकला. आयपीएलची फायनल जिंकल्यानंतर बेंगळुरूवर पैशांचा वर्षावर होत आहे. यंदाच्या आयपीएल सीझनमध्ये कोणत्या संघाला किेती रुपये मिळाले, जाणून घेऊयात.
आयपीएल २०२५ चा चषक जिंकणाऱ्या आरसीबीला २० कोटी रुपयांचं बक्षीस मिळालं आहे. मागील वर्षी कोलकाता नाइट रायडर्सने २० कोटी रुपये जिंकले होते. एकीकडे बेंगळुरुवर पैशांचा वर्षाव सुरु असताना पंजाब किंग्सवरही पैशांचा वर्षाव सुरु आहे. उपविजेत्या पंजाबला १३ कोटी रुपये मिळाले आहेत. तर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सलाही पैसे मिळाले. त्यांना अनुक्रमे ७ कोटी आणि ६.५ कोटी रुपये मिळाले.
अहमदाबाद नरेंद्र मोदी स्डेडियममध्ये आरसीबीने टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजीचं आमंत्रण मिळालं. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने १९० धावांचा विशाल आव्हान उभं केलं. या डावात आरसीबीच्या एकाही खेळाडूने अर्धशतक ठोकलं नाही. तरीही आरसीबीने १९० धावा कुटल्या. आरसीबीने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाब किंग्सने २० षटकात १८४ धावा कुटल्या.
जोश हेजलवूडने ४ षटकात ५४ धावा देऊन महागडा गोलंदाज ठरला. मात्र, दुसरीकडे बेंगळुरुच्या इतर गोलंदाजांनी भेदक मारा केला. विराट कोहलीने संघाच्या गोलंदाजांचं कौतुक केलं.
आरसीबीने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना पंजाबच्या संघातील खेळाडूंचे विकेट एकामागोमाग गेले. फक्त पंजाबमधील शंशाकने ३० चेंडूत ६१ धावा कुटल्या. पहिल्यांदा संधी चालून आलेल्या पंजाब किंग्सने विजयाची संधी गमावली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.