Ravindra Jadeja Catch Video: जड्डू होता म्हणून पकडला,दुसरा कोणी असता तर सुटलाच असता; पाहा जडेजाच्या भन्नाट झेलचा VIDEO

India vs West Indies 1st ODI: दरम्यान ३ गडी बाद करणारा रविंद्र जडेजा आणखी एका कारणामुळे चर्चेत आला आहे.
Ravindra Jadeja Catch
Ravindra Jadeja Catchsaam tv
Published On: 

[Watch] Ravindra Jadeja Catch Video:

भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामान्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला वनडे सामना बार्बाडोसच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ५ गडी राखुन विजय मिळवला.

या सामन्यात ४ गडी बाद करणारा कुलदीप यादव सामन्याचा हिरो ठरला. कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजाने मिळून वेस्टइंडीज संघाचा डाव अवघ्या ११४ धावांवर संपुष्टात आणला. दरम्यान ३ गडी बाद करणारा रविंद्र जडेजा आणखी एका कारणामुळे चर्चेत आला आहे.

Ravindra Jadeja Catch
IND vs WI: कुलदीप-जड्डूची जोडी चमकली! पहिल्याच सामन्यात 'या' मोठ्या विक्रमाला घातली गवसणी

रविंद्र जडेजाचा भन्नाट झेल..

रविंद्र जडेजा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे. त्याने आतापर्यंत अनेक भन्नाट झेल टिपले आहेत. यात आता आणखी एका झेलची भर पडली आहे. रविंद्र जडेजाने वेस्टइंडीज विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात अप्रतिम झेल टिपला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

तर झाले असे की, वेस्टइंडीज संघाची फलंदाजी सुरु असताना मुकेश कुमार गोलंदाजीला आला होता. या सामन्यातील ८ व्या षटकाचा सामना करण्यासाठी अलिक अथनाझे फलंदाजीला आला होता. त्यावेळी मुकेश कुमारने ऑफ साईडच्या दिशेने शॉर्ट चेंडू टाकला. (Ravindra Jadeja Catch Video)

ज्यावर अलिक अथनाझेने पॉईंटच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्न फसला कारण पॉईंटला क्षेत्ररक्षण करत असलेल्या रविंद्र जडेजाने उडी मारत झेल टिपला. या झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. (Latest sports updates)

Ravindra Jadeja Catch
IND vs WI: ..म्हणून रोहितने थेट बॅटिंग ऑर्डरच बदलली! सामन्यानंतर केला मोठा खुलासा

मुकेश कुमारला मिळाली पहिली विकेट..

वेस्टइंडीज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मुकेश कुमारला पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. या सामन्यात त्याने अप्रतिम गोलंदाजी केली होती. आता त्याला वेस्टइंडीज विरुद्धच्या वनडे मालिकेतून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे.

या सामन्यात देखील अचूक टप्प्यावर गोलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याने अलिक अथनाझेला बाद करत वनडे कारकिर्दीतील पहिली विकेट मिळवली आहे. या डावात त्याने ५ षटक गोलंदाजी केली. यादरम्यान त्याने २२ धावा खर्च करत १ गडी बाद केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com