

Ravi shastri: सध्या भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये 2 कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या २ सामन्यात भारतीय संघाने जोरदार कामगिरी करत २-० ने आघाडी घेतली आहे. तर मालिकेतील तिसरा कसोटी सामना येत्या 1 मार्चपासून सुरू होणार आहे.
काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने उर्वरित 2 कसोटी सांमन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली होती. तर केएल राहुलला उपकर्णधार पदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. आता भारतीय संघाचा पुढील उपकर्णधार कोण? असा प्रश्न उपस्थित होत असताना माजी भारतीय मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठे वक्तव्य केले आहे. (Latest sports updates)
रवी शास्त्री यांनी या प्रकरणात आता आपले मत मांडले आहे. त्यांचे स्पष्ट मत आहे की, मायदेशात होणाऱ्या कसोटी मालिकांमध्ये उपकर्णधारपद काढून टाकलं पाहिजे. कारण संघाचा उपकर्णधार फॉर्ममध्ये नसेल तर याचा संघावर वाईट परिणाम पडतो.
रवी शास्त्री म्हणाले की, 'भारतीय संघाने उपकर्णधार बनवू नये. जर सामन्यात एखाद्या वेळेस कर्णधाराला बाहेर जावं लागलं तर त्याच्याऐवजी एखादा खेळाडू त्याची जागा घेऊ शकतो. मायदेशात तर उपकर्णधाराची आवश्यकता नाही. परदेशात खेळताना याबाबत विचार केला जाऊ शकतो.
केएल राहुल सध्या चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरतोय . अनेकदा संधी मिळूनही त्याला धावा करता येत नाहीये. त्यामुळे त्याला उपकर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले आहे. या फ्लॉप कामगिरीनंतर त्याला संघाबाहेर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अनेक दिग्गजांनी केएल राहुलला संघाबाहेर करून शुभमन गिलला संधी देण्याची मागणी केली आहे.
बॉर्डर गावसकर मालिकेचे वेळापत्रक..
पहिला कसोटी सामना : भारतीय संघाचा 1 डाव आणि 132 धावांनी विजय
दूसरा कसोटी सामना : भारतीय संघाचा 6 गडी राखून विजय
तिसरा कसोटी सामना : 1 मार्च ते 5 मार्च, इंदोर
चौथा कसोटी सामना : 9 ते 13 मार्च, अहमदाबाद
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.