AUS VS SA: तब्बल ३१ वर्षांनंतर संपणार विजयाचा दुष्काळ! दक्षिण आफ्रिका इतिहासाची पुनरावृत्ती करणार का?

आज पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेचा वरिष्ठ संघ आयसीसीचा अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे
South Africa womens cricket team
South Africa womens cricket team Saam TV
Published On

AUS vs SA Final: दक्षिण आफ्रिकेसाठी आजचा दिवस ऐतिहासिक दिवस असणार आहे. कारण आज पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेचा वरिष्ठ संघ आयसीसीचा अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

नुकताच सुरू असलेल्या आयसीसी महिला टी २० विश्वचषक २०२३ स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने अंतिम फेरी गाठली आहे. (Latest Sports Updates)

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सामना ५ वेळेस विजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध होणार आहे. आजच्याच दिवशी म्हणजे २६ फेब्रुवारी १९९२ रोजी दक्षिण आफ्रिका पुरुष संघाने विश्वचषक स्पर्धेतील पहिला विजय मिळवला होता.

तर आजच्याच दिवशी दक्षिण आफ्रिका महिला संघाला विश्वचषक जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. त्यामुळे जर दक्षिण आफ्रिका संघाला हा सामना जिंकण्यात यश आले तर नक्कीच आज इतिहास घडणार.

South Africa womens cricket team
David Warner Viral Video : डेव्हिड वॉर्नरवर पुन्हा चढला साऊथचा फिव्हर, ऍक्शन सीनमध्ये करतोय कुस्तीपटूंची जोरदार धुलाई - VIDEO

दक्षिण आफ्रिका संघ बऱ्याच वर्षांपासून क्रिकेट खेळत आहे. मात्र या संघाला देखील वर्णद्वेषी टीकेचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे संघाला क्रिकेटपासून दूर राहावे लागले होते. तर १९९२ मध्ये दक्षिण आफ्रिकेने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक केले होते.

याच वर्षी दक्षिण आफ्रिकेला पहिला विश्वचषक खेळण्याची संधी मिळाली. तर पहिला सामना २६ फेब्रुवारी रोजी पार पडला होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत केले होते.

South Africa womens cricket team
Cricket Funny Viral Video: 'शॅन जरा पातल झालाय'; भन्नाट पिच रिपोर्ट पाहून हसून हसून लोटपोट व्हाल

सिडनीच्या मैदानावर फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाने ४९ षटकअखेर ९ गडी बाद १७० धावा केल्या होत्या. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या एकही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नव्हती.

हे आव्हान दक्षिण आफ्रिका संघाने सहजरित्या पूर्ण केले होते. दक्षिण आफ्रिका संघाकडून कर्णधार वेसल्सने ८१ धावांची खेळी केली होती. पीटर कर्स्टनने ४९ धावांचे बहुमूल्य योगदान दिले होते.

विजयी सुरुवात.. आता विजयाने शेवट होणार का?

दक्षिण आफ्रिका संघाने १९९२ मध्ये विजयी सुरुवात केली होती. आता ३१ वर्षांनंतर पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिका संघाला इतिहास रचण्याची संधी असणार आहे.

महिला विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत २ वेळेस यजमान संघाला जेतेपद मिळवण्यात यश आले आहे. तर दक्षिण आफ्रिका संघ हा मान मिळवणारा तिसरा संघ बनू शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com