R Ashwin Record: डॉमिनिका कसोटीच्या पहिल्याच दिवशी अश्विनचा महारेकॉर्ड! दिग्गजांना मागे सोडत 'या' बाबतीत बनला नंबर 1

IND vs WI 1st Test: या डावात ५ गडी बाद करणाऱ्या आर अश्विनने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
R Ashwin in 1st test against West Indies
R Ashwin in 1st test against West Indiessaam tv
Published On: 

Most Wickets For India: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात झालेला पराभव विसरून भारतीय संघाने आता नवी सुरुवात केली आहे. भारतीय संघ वेस्टइंडीजमध्ये असून दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामान्यांच्या मालिकेला प्रारंभ झाला आहे.

मालिकेतील पहिला कसोटी सामना डॉमिनिकाच्या विंडसर पार्कच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या डावात वेस्टइंडीजचा पहिला डाव अवघ्या १५० धावांवर संपुष्टात आला आहे. दरम्यान या डावात ५ गडी बाद करणाऱ्या आर अश्विनने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

R Ashwin in 1st test against West Indies
IND vs WI Weather Report: भारत-वेस्टइंडीज कसोटीवर आस्मानी संकट! पाचपैकी इतके दिवस पडणार पाऊस; जाणून घ्या कसं असेल हवामान

डॉमनिका कसोटीत आर अश्विनचा हल्लाबोल...

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला होता. या सामन्यासाठी आर अश्विनला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं गेलं नव्हतं. मात्र आता संधी मिळताच त्याने दाखवून दिलं आहे की, तो संघासाठी महत्वाचा का आहे.

सुरुवातीच्या २ सेशनमध्ये आर अश्विनच्या गोलंदाजीचा दबदबा पाहायला मिळाला आहे. त्याने सुरुवातीच्या २ सेशनमध्ये वेस्टइंडीजच्या ४ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली. ज्यात दोन्ही सलामीवीर फलंदाजांचा समावेश होता. तर पहिल्या डावात त्याने ५ विकेट्स घेतल्या आहेत. (Latest sports updates)

R Ashwin in 1st test against West Indies
Shubman Gill Catch Video: चान्स पे डान्स! शॉट लेगला डाइव्ह मारत गिलचा भन्नाट कॅच; VIDEO एकदा पाहाच

आर अश्विनचा महारेकॉर्ड...

या डावात तिसरा विकेट घेताच आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७०० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. आर अश्विन ७०० किंवा त्यापेक्षा अधिक गडी बाद करणारा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. तर सर्वात कमी चेंडू फेकून ७०० विकेट्स घेणारा अश्विन हा पहिलाच गोलंदाज ठरला आहे.

अशी कामगिरी करणारा ठरला तिसराच गोलंदाज..

भारतीय संघासाठी सर्वाधिक गडी बाद करण्याच्या बाबतीत आर अश्विन तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. आता त्याच्याकडे हरभजन सिंगला मागे सोडण्याची संधी आहे. हरभजन सिंगने भारतीय संघासाठी खेळताना ७०७ विकेट्स घेतल्या आहेत. तर ९५३ विकेट्स घेणारे अनिल कुंबळे या यादीत अव्वल स्थानी आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.