IND vs WI Weather Report: भारत-वेस्टइंडीज कसोटीवर आस्मानी संकट! पाचपैकी इतके दिवस पडणार पाऊस; जाणून घ्या कसं असेल हवामान

IND vs WI Rain Updates: भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये आजपासून २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे
IND vs WI Weather Report
IND vs WI Weather Reportsaam tv
Published On: 

IND vs WI 1st Test: भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये आजपासून २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना डॉमिनिकातील विंडसर पार्कच्या मैदानावर रंगणार आहे.

या सामन्याच्या पहिल्या दिवशी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. तर पुढील ३ दिवस वातावरण उत्तम असणार आहे. तर सामन्याच्या पाचव्या दिवशी देखील पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे.

IND vs WI Weather Report
Most Runs Against West Indies: रोहित, विराट नव्हे तर 'हे' आहेत वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे टॉप 3 फलंदाज

भारत वेस्टइंडीज सामन्यावर पावसाचं संकट..

या सामन्यावर पावसाचं संकट असणार आहे. जर सामना पाचव्या दिवसापर्यंत गेला. तर सुरुवातीच्या ४ दिवसांपेक्षा पाचव्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला दिलेल्या मुलाखतीत कर्णधार रोहित शर्माने म्हटले आहे की, यशस्वी जयस्वाल डावाची सुरुवात करताना दिसून येणार आहे.

तर शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसून येणार आहे. तर विराट कोहली नेहमीप्रमाणे चौथ्या क्रमांकावर आणि अजिंक्य रहाणे पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसून येणार आहे. रोहितला विश्वास आहे की, आयपीएल स्पर्धेत दमदार कामगिरी करणारा यशस्वी जयस्वाल भारतीय संघासाठी देखील दमदार कामगिरी करेल. (Latest sports updates)

IND vs WI Weather Report
Most Runs Against West Indies: रोहित, विराट नव्हे तर 'हे' आहेत वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे टॉप 3 फलंदाज

पुजारा संघाबाहेर..

भारतीय संघाची घोषणा होताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण या संघात अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराचं नाव नव्हतं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे त्याला संघाबाहेर केलं गेलं आहे.

तर त्याच्याऐवजी यशस्वी जयस्वाल आणि ऋतूराज गायकवाडला संघात स्थान दिलं गेलं आहे. मात्र पुजारासाठी अजूनही भारतीय संघात कमबॅक करण्याचे दार उघडे आहेत, असं बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.

वेस्ट इंडिजविरूद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड़, विराट कोहली, यशस्वी जयसवाल, अजिंक्य रहाणे (कर्णधार), केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जड़ेजा, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनादकट, नवदीप सैनी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com