

पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) २०२६ दरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. डोक्याला चेंडू लागल्यानं खेळाडू जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इस्लामाबाद युनायटेडच्या नेट सेशनमध्य दुर्घटना घडली आहे. मीर हमजा सज्जाद असं खेळाडूचे नाव असून चेंडू लागल्याने तो मैदानात बेशुद्ध होऊ पडला होता. दरम्यान सज्जाद सध्या शुद्धीवर असून त्याची प्रकृती स्थिर आहे. ही घटना मंगळवारी हनीफ मोहम्मद हाय-परफॉर्मन्स सेंटरमध्ये सराव सत्रादरम्यान घडली.
संघाचा फलंदाज मार्क चॅपमन सराव करत होता. त्याने एका फटका मारला तो थेट क्षेत्ररक्षण करणाऱ्या सज्जादच्या डोक्याला लागला. चेंडू लागताच तो जमिनीवर पडला आणि बेशुद्ध झाला. घटनेनंतर सज्जादला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, तो आता शुद्धीवर असून त्याची प्रकृती स्थिर आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, कोणतीही गंभीर दुखापत झाली आहे का, याची खात्री करण्यासाठी सीटी स्कॅन केला जाईल.
या घटनेनंतर संपूर्ण सराव सत्र थांबवण्यात आले. खेळाडू गंभीर जखमी झालेल्यानं इतर खेळाडू व सहाय्यक कर्मचारी चिंतेत पडले होते. फ्रँचायझीकडून कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आले नसले तरी, त्याची प्रकृती स्थिर असल्याच्या बातमीने निश्चितच दिलासा मिळाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.