

टीम इंडियासाठी यंदा पदार्पण करणाऱ्या गुरनूर ब्रारला न्यूझीलंड दौऱ्यातील वनडे सिरीजमध्ये संधी मिळाली आहे. सिरीजमधील शेवटच्या दोन वनडे सामन्यांसाठी त्याचा टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आलाय. मात्र या सगळ्यात गुरनूर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. सध्या त्याच्या नावाने एक प्रायव्हेट चॅट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतंय. हे चॅट गुरनूर ब्रारचाच असल्याचा दावा काही सोशल मीडिया युजर्स करत आहेत. मात्र या व्हायरल चॅटची आम्ही पुष्टी करत नाही.
व्हायरल होत असलेला हा चॅट स्नॅपचॅट अॅपवरील आहे. या चॅटमध्ये गुरनूरचा एक शर्टलेस फोटोही दिसतोय. या फोटोमध्ये त्याने शरीराचा काही भाग टॉवेलने झाकलेला आहे. हा फोटो गुरनूरचाच असल्याचा दावा करणारे युजर्स त्याच्या गळ्यातील चेनचा आधार घेत आहेत.
कारण गुरनूरने याआधी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका फोटोमध्येही अशीच चेन घातलेली दिसतेय. व्हायरल फोटोतील चेन आणि इन्स्टाग्रामवरील फोटोतील चेन सारखीच असल्याचं युजर्सचं म्हणणं आहे.
दरम्यान गुरनूर ब्रार हा पंजाबकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. त्याची उंची 6 फूट 5 इंच आहे. त्याने आतापर्यंत भारतासाठी एकूण 9 वनडे सामने खेळलेत. याच वर्षी जून महिन्यात अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. या 9 सामन्यांमध्ये त्याने एकूण 14 विकेट्स घेतल्या आहेत. 27 रन्स देऊन 3 विकेट्स ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्येही गुरनूरने पंजाबकडून चांगली कामगिरी केलीये. पंजाबसाठी त्याने आतापर्यंत 22 फर्स्ट क्लास, 28 लिस्ट ए आणि 9 टी-20 सामने खेळले आहेत. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 71 विकेट्स आहेत. तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने 26 आणि टी-20 क्रिकेटमध्ये 18 विकेट्स घेतल्या आहेत.
याशिवाय गुरनूर आयपीएलमध्येही खेळतो. तो शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स टीमचा भाग आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.