PBKS vs CSK: पंजाबच्या चक्रव्यूहात अडकली सीएसके; चेन्नईचा सलग चौथा पराभव

Punjab Kings vs Chennai Super Kings : इंडियन प्रीमियर लीगचा २२ वा सामना पंजाब किंग्ज (PBKS) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात झाला. यात सामन्यात पंजाब संघाने विजय मिळवला.
PBKS vs CSK
Punjab Kings vs Chennai Super Kings saam tv
Published On

पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना पंजाबमधील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. घरच्या मैदानात झालेल्या सामन्यात पंजाबने १८ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर पंजाबने प्रथम फलंदाजी करत प्रियांश आर्यच्या झंझावाती शतकाच्या जोरावर चेन्नईसमोर २२० धावांचे लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नई संघाचा पुन्हा एकदा पराभव झाला.

PBKS vs CSK
KKR Vs LSG: केकेआरचा डाव चुकला; रिंकू सिंहबाबतचा निर्णय घेतला अन् केकेआरनं सामना गमावला

मुल्लानपूर येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात २४ वर्षीय तरुण फलंदाज प्रियांश आर्यने स्फोटक शतक झळकावून संघाचे लक्ष वेधलं. प्रियांशने आपल्या शतकी खेळीने पंजाबच्या संघाला २१९ धावांच्या मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. चेन्नईसाठी ही धावसंख्या खूप मोठी ठरली कारण सीएसके फक्त २०१ धावाच करू शकला. या सामन्यात पंजाबच्या संघाची गोलंदाजांनी चेन्नईच्या फलंदाजांना मोठी खेळी करू दिली नाही. डावाच्या सुरुवातीपासून चेन्नईने आपलं वर्चस्व ठेवलं होतं. परंतु चेन्नईचा संघाचं धाव फलक हवे तसे हलत नव्हते.

PBKS vs CSK
PBKS vs CSK: प्रियांश आर्याचं धमाकेदार शतक; चेन्नईसमोर उभारला धावांचा डोंगर

पंजाबच्या २२० धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात चांगली झाली. ६ षटकांनंतर चेन्नई संघाने ५९ धावा केल्या. रचिन रवींद्र आणि डेव्हॉन कॉनवे यांच्यातील ५० धावांची भागीदारी केली होती. रचिन रवींद्रने ३६ धावा केल्या. चेन्नई संघाला पहिला धक्का रचिन रवींद्रच्या रूपाने बसला. ३६ धावा काढल्यानंतर तो ग्लेन मॅक्सवेलचा बळी ठरला. पण गायकवाडची बॅट चालली नाही. रवींद्र ७ व्या षटकात बाद झाला.

यानंतर ऋतुराज गायकवाड एक धाव करून बाद झाला. यानंतर कॉनवे आणि शिवम दुबे यांच्यात चांगली भागीदारी झाली. कॉनवेनेही अर्धशतक ठोकले. पण दुबे बाद झाल्यानंतर धोनी फलंदाजीला आला. धोनीने १२ चेंडूत २७ धावा केल्या. पण चेन्नईला विजय मिळवून देऊ शकला नाही. पंजाब आणि चेन्नई यांच्यातील हा सामना दोन्ही संघांसाठी विजयाच्या मार्गावर परतण्याची संधी होती. या सामन्यात खराब क्षेत्ररक्षणामुळे दोन्ही संघांनी एकमेकांना भरपूर संधी दिल्या. पंजाबच्या संघाने याचा फायदा घेतला.

तर क्षेत्ररक्षण करताना पंजाबच्या खेळाडूंनीही अनेक कॅच सोडल्या. चेन्नईला धावा करू न दिल्यानं चेन्नईला २१९ धावाचं आव्हान मोठ ठरलं. क्षेत्ररक्षण करताना चेन्नईच्या खेळाडूंनी अनेक चुका केल्या. पण पंजाबचा सलामीवीर प्रियांशने मिळालेल्या जीवनदानचा फायदा घेत शतक ठोकलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com