PBKS vs CSK: प्रियांश आर्याचं धमाकेदार शतक; चेन्नईसमोर उभारला धावांचा डोंगर

PBKS vs CSK: इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज पंजाब किंग्ज (PBKS) आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होतोय. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर पंजाबने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
PBKS vs CSK: प्रियांश आर्याचं धमाकेदार शतक; चेन्नईसमोर उभारला धावांचा डोंगर
Published On

इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज २२ वा सामना पंजाब किंग्ज (PBKS) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात होतोय. हा सामना न्यू चंदीगड (मुल्लानपूर) येथील महाराज यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जातोय. या सामन्यात पंजाबच्या संघाने २० षटकात ६ विकेट गमावत २१९ धावा केल्या. चेन्नईला विजयासाठी २२० धावा कराव्या लागणार आहेत. नाणेफेक जिंकल्यानंतर पंजाबने प्रथम फलंदाजी करत प्रियांश आर्यच्या झंझावाती शतकाच्या जोरावर चेन्नईसमोर २२० धावांचे लक्ष्य ठेवले.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबची सुरुवात चांगली झाली नाही. दुसऱ्याच षटकात मुकेश चौधरीने प्रभसिमरन सिंगला बाद केले. प्रभसिमरनला खातेही उघडता आले नाही. यानंतर, तिसऱ्या षटकात अय्यरही बाद झाला. त्याच्या बॅटमधून फक्त ९ धावा आल्या. मार्कस स्टोइनिसलाही चांगली कामगिरी करता आली नाही.

यानंतर अश्विनने त्याच षटकात नेहल वधेरा आणि ग्लेन मॅक्सवेलला बाद केले. पण एका बाजूला प्रियांश आर्यने शानदार फलंदाजी केली. त्याने फक्त ३९ चेंडूत शतक झळकावले. त्याचवेळी, शशांक सिंगनेही स्फोटक फलंदाजी केली. या दोघांच्या फलंदाजीमुळे पंजाबने चेन्नई सुपर किंग्जसमोर २२० धावांचा डोंगर उभा केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com