Paris Olympics: विनेश फोगटसह ६ कुस्तीपटूंची 'लॉटरी'; पॅरिस ऑलिंपिकमध्ये होणार थेट एंट्री
Paris Olympics WFI Rule For Wrestlersmykhel

Paris Olympics: विनेश फोगटसह ६ कुस्तीपटूंना 'लॉटरी'; पॅरिस ऑलिम्पिकमध्ये होणार थेट एन्ट्री

Paris Olympics WFI Rule For Wrestlers : पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी भारतीय कुस्ती संघटनेने मोठा निर्णय घेतलाय. संजय सिंग यांच्या नेतृत्वाखाली WFI ने कोटा मिळालेल्या कुस्तीपटूंच्या चाचण्या रद्द केल्यात. ट्रायल रद्द केल्यामुळे विनेश फोगटसह ६ कुस्तीपटूंचा पॅरिस ऑलिम्पिकचा मार्ग मोकळा झालाय.
Published on

नवी दिल्ली: पॅरिस ऑलिम्पिक सुरू होण्यासाठी फक्त दोन महिने बाकी राहिलेत. भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिकसाठी आपली तयारी सुरू केलीय. भारतात यासाठी ट्रायलही सुरू करण्यात आलेत. याचदरम्यान भारतीय कुस्ती महासंघाने एक मोठा निर्णय घेतलाय. राखीव कोटा मिळालेल्या कुस्तीपटूंना आता थेट पॅरिस ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळणार आहे.

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांनी इतर अधिकाऱ्यांसह मिळून जुने नियम मोडीत काढत हा निर्णय घेतलाय. मात्र त्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. परंतु या निर्णयामुळे विनेश फोगटसह ६ कोटा कुस्तीपटूंना ऑलिम्पिकसाठी चाचण्या द्याव्या लागणार नाहीत.

भारतीय कुस्ती संघ काही कुस्तीपटूंना पात्रता स्पर्धांद्वारे ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश देत होता. परंतु लैंगिक शोषण प्रकरणातील संशयित आरोपी असलेल्या ब्रिजभूषण सिंह यांच्या अध्यक्षतेखाली WFI ने कोटा असूनही २०२१ मध्ये चाचण्यांसाठी नियम बदलला होता. या नियमामुळे तरुण खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते. ऑलिम्पिक कोटा मिळाल्यानंतर अमन सेहरावत आणि निशा दहियासह काही कुस्तीपटूंनी चाचण्यांच्या समस्येचे कारण देत कुस्ती संघटनेला ट्रायल्स थांबवण्यास सांगितले होते.

Paris Olympics: विनेश फोगटसह ६ कुस्तीपटूंची 'लॉटरी'; पॅरिस ऑलिंपिकमध्ये होणार थेट एंट्री
RR vs RCB Weather Report: राजस्थान -बंगळुरु सामना पावसामुळे धुतला जाणार? वाचा हवामानाची लेटेस्ट अपडेट

द ट्रिब्यूनने आपल्या अहवालात डब्ल्यूएफआयच्या सूत्रांचा हवाला दिला आहे की, युनियनमधील बहुतेक अधिकारी चाचणी न घेण्याच्या बाजूने आहेत. रिपोर्टनुसार, असोसिएशनचे म्हणणे आहे की कुस्तीपटूंसाठी वजन राखणे ही सर्वात मोठी समस्या आहे. अनेक खेळाडूंनी त्यांना पत्र लिहून दुखापतीची भीती व्यक्त केली होती. ऑलिम्पिकपूर्वी सर्व कुस्तीपटूंनी तंदुरुस्त राहावे, अशी भारतीय कुस्ती संघटनेची इच्छा आहे. या गोष्टी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलंय.

Paris Olympics: विनेश फोगटसह ६ कुस्तीपटूंची 'लॉटरी'; पॅरिस ऑलिंपिकमध्ये होणार थेट एंट्री
RR vs RCB,Playing XI: RCB चं टेन्शन वाढणार! महत्वाच्या सामन्यात RR च्या ताफ्यात विस्फोटक फलंदाजाची एन्ट्री

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com