PAK vs AFG: चेपॉकवर बाबरला सूर गवसला!अफगाणिस्तानला स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी २८३ धावांची गरज

Babar Azam: या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने दमदार खेळ केल्याचे पाहायला मिळाले आहे.
BABAR AZAM
BABAR AZAMtwitter
Published On: 

Pakistan vs Afghanistan, World Cup:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील २२ वा सामना पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात पाकिस्तान संघाकडून अब्दुल्ला शफिकने अर्धशतकी खेळी केली. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फसंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ७ गडी बाद २८२ धावा केल्या आहेत. अफगाणिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी २८३ धावांची गरज आहे.

पाकिस्तानने केल्या २८२ धावा..

या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानकडून प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर फलंदाज अब्दुल्ला शफिकने ७५ चेंडूंचा सामना करत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५८ धावांची खेळी केली.

या स्पर्धेत फॉर्मच्या शोधात असलेल्या बाबर आझमला या सामन्यात सुर गवसला आहे. या डावात त्याने ९२ चेंडूंचा सामना करत ४ चौकर आणि १ षटकाराच्या मदतीने ७४ धावा केल्या. या सामन्यात त्याची शतकाची प्रतिक्षा संपेल असं वाटत असताना नुर अहमदने त्याला बाद करत माघारी धाडले. (Latest sports updates)

BABAR AZAM
IND vs NZ: फिल्डिंग कोचचा नवा अविष्कार! मोठ्या स्क्रीनवर नव्हे तर हटके पद्धतीने केली बेस्ट फिल्डरची घोषणा; Video

शेवटी सौद शकीलने ३४ चेंडूंचा सामना करत २५ तर शादाब खानने ३८ चेंडूंचा सामना करत ४० धावांची खेळी करून संघाची धावसंख्या २८२ धावांपर्यंत पोहचवली. आता अफगाणिस्तानला स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी २८३ धावांची गरज आहे.

या डावात गोलंदाजी करताना नुर अहमद हा अफगाणिस्तान संघासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. नुर अहमदने १० षटकं गोलंदाजी करत ४९ धावा खर्च केल्या. यादरम्यान त्याने ३ गडी बाद केले.

BABAR AZAM
IND vs NZ, 1st Inning: शमीच्या वादळापुढं न्यूझीलंड ढेपाळली! टीम इंडियाला विजयाचं 'पंचक' साजरं करण्यासाठी २७४ धावांचं आव्हान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com