World Cup 2023: अखेर भारतासमोर पाकिस्तान झुकलं! वर्ल्डकपसाठी भारतात येण्याबाबत पाकिस्तान सरकारने घेतला मोठा निर्णय

Pakistan Cricket Board On World Cup: वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डने मोठा निर्णय घेतला आहे.
Ind vs Pak
Ind vs Paksaam tv
Published On: 

India vs Pakistan: भारतात यावर्षी वनडे वर्ल्डकप स्पर्धचा थरार रंगणार आहे. काही महिन्यांपूर्वी या स्पर्धेसाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बहुप्रतिक्षीत भारत- पाकिस्तान सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवर रंगणार आहे.

मात्र पाकिस्तान सरकारने खेळाडूंना भारतात पाठवण्याची अधिकृत परवानगी दिली नव्हती. दरम्यान स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना पाकिस्तान सरकारने मोठा बदल केला आहे.

Ind vs Pak
IND vs WI 2nd T20: ..तर पराभव टळू शकला असता, हार्दिक पंड्याची ही एक चूक टीम इंडियाला पडली महागात

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार,अखेर पाकिस्तान सरकारने पाकिस्तान क्रिकेट संघाला वर्ल्डकप २०२३ स्पर्धेसाठी भारतात येऊन खेळण्याची अनुमती दिली आहे.

आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेचा थरार यावेळी भारतीय संघात रंगणार आहे. ही स्पर्धा होण्यापूर्वी आशिया चषक स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे.मात्र बीसीसीआयने ही स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानात जाण्यास नकार दिला होता.

त्यामुळे या स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान आणि श्रीलंकेत केले जाणार आहे. याच गोष्टीचा राग मनात धरून पाकिस्तानने वर्ल्डकप खेळण्यासाठी भारतात येण्यास बहिष्कार घालण्याची भाषा केली होती.

मात्र आता पाकिस्तान संघाला भारतात येण्याची अनुमती दिल्यामुळे या सर्व पोकळ धमक्या होत्या हे सिद्ध झालं आहे. भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने अखेर पाकिस्तानला या स्पर्धेचे आयोजन हायब्रिड मॉडेलमध्ये करावे लागले आहे. (Latest sports updates)

Ind vs Pak
IND VS WI: संघाबाहेर असूनही किंग कोहली का होतोय ट्रेंड? टीम इंडियाच्या पराभवाचं अन् विराटचं काय आहे कनेक्शन; जाणून घ्या

आगामी आशिया चषक २०२३ स्पर्धेचे वेळापत्रक...

पाकिस्तान विरुद्ध नेपाळ - ३० ऑगस्ट

बांगलादेश विरुद्ध श्रीलंका - ३१ ऑगस्ट

भारत विरुद्ध पाकिस्तान - २ सप्टेंबर

बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान - ३ सप्टेंबर

भारत विरुद्ध नेपाळ - ४ सप्टेंबर

श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान - ५ सप्टेंबर

सुपर-२४ सामने

अ १ विरुद्ध ब २ - ६ सप्टेंबर

ब १ विरुद्ध ब २ - ९ सप्टेंबर

अ १ विरुद्ध अ २ - १० सप्टेंबर

अ २ विरुद्ध ब १- १२ सप्टेंबर

अ १ विरुद्ध ब १ - १४ सप्टेंबर

अ २ विरुद्ध ब २ - १५ सप्टेंबर

अंतिम सामना - १७ सप्टेंबर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com