
ओव्हल कसोटीआधी इंग्लंड संघाला मोठा धक्का
बेन स्टोक्स दुखापतीमुळे बाहेर
जोफ्रा आर्चर, डॉसन आणि ब्रायडन कार्स देखील 'आऊट'
इंग्लंड प्लेइंग इलेव्हनमध्ये चार महत्त्वाचे बदल
भारताविरुद्धच्या महत्वाच्या आणि निर्णायक ओव्हल कसोटीच्या एक दिवस आधीच इंग्लंडच्या संघाला मोठा हादरा बसला आहे. पाचव्या आणि अखेरच्या महत्वाच्या कसोटी सामन्याला कर्णधार बेन स्टोक्स मुकला आहे. दुखापतीमुळं स्टोक्स संघाबाहेर झाला आहे. त्याच्या जागी ओली पोप हा संघाचं नेतृत्व करणार आहे. यासह त्यांचा हुकमी गोलंदाज जोफ्रा आर्चर देखील खेळू शकणार नाही.
इंग्लंडने भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. संघाचा कर्णधार बेन स्टोक्स हा दुखापतीमुळं ओव्हलवर होणाऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. त्याची जागा ओली पोप घेणार आहे. इंग्लंडच्या निवड समितीनं भारताविरुद्ध ओव्हल मैदानावर होणाऱ्या अखेरच्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये चार बदल केले आहेत.
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स हा खांद्याला झालेल्या दुखापतीमुळं पाचव्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर बेन स्टोक्स हा जबरदस्त कामगिरी करत आहे. अशावेळी निर्णायक सामन्यातून स्टोक्स बाहेर होणं हा इंग्लंडसाठी मोठा धक्का मानला जात आहे. स्टोक्सने ४ सामन्यांमध्ये ३०४ धावा केल्या आहेत. मँचेस्टर कसोटीत तर त्यानं शतक झळकावलं आहे.
स्टोक्स हा या मालिकेत आतापर्यंत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. चार सामन्यांत त्याने १७ विकेट्स घेतल्या आहेत. फिरकीपटू लियाम डॉसन आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि ब्रायडन कार्स हे देखील संघात नसतील. बेन स्टोक्सने आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे. इंग्लंड संघाकडून सर्वाधिक विकेट स्टोक्सनेच घेतले आहेत. स्टोक्सला चौथ्या कसोटी सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला आता पाचवा कसोटी सामना खेळता येणार नाही.
बेन स्टोक्सच्या गैरहजेरीत ओली पोप हा कर्णधारपद सांभाळणार आहे. जॅक क्रॉली आणि बेन डकेट ही जोडी असणार आहे. सध्या फॉर्मात असलेला जो रूट देखील पाचव्या कसोटीत खेळणार आहे. हॅरी ब्रुक, जॅकब बेथेल, जेमी स्मिथ यांना प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आलं आहे. ख्रिस वोक्स, गस एटकिंसन, जेमी ओवर्टन आणि जोश टंग यांचाही प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.