India Playing 11 vs Eng : ओव्हल कसोटीत टीम इंडियात होणार ४ बदल; अशी असू शकते संभाव्य प्लेइंग ११

India vs England 5th test Oval Playing 11 : इंग्लंडच्याविरुद्ध पाचव्या कसोटीत भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चार बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुखापतीमुळं दोन, तर उर्वरित दोन बदल हे संघांच्या आवश्यकतेनुसार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
भारतीय संघात होणार मोठे बदल, प्लेइंग इलेव्हन कशी असेल? कोणत्या ४ खेळाडूंना मिळणार संधी?
team india playing 11 vs england at Oval testx
Published On
Summary
  • भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानात होणार

  • भारतीय संघात होणार चार बदल, कुणाला मिळणार संधी?

  • ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संघाबाहेर होणार

  • ध्रुव जुरेल आणि अर्शदीप सिंग यांना मिळू शकते संधी

Summary

Team India Playing 11 against England At Oval : भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना लंडनच्या ओव्हल मैदानात होत आहे. ३१ जुलैपासून हा कसोटी सामना सुरू होईल. दुखापतीमुळं त्रस्त असलेल्या भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल याबाबत कमालीची उत्सुकता आहे. त्याचवेळी धडाकेबाज फलंदाज रिषभ पंत हा पायाच्या दुखापतीमुळं संघाबाहेर झाला आहे. तर मेडिकल टीमने जसप्रीत बुमराहला देखील खेळण्यास अद्याप हिरवा कंदील दिलेला नाही. त्यामुळे तो देखील पाचव्या कसोटीत खेळण्याची शक्यता धुसर झाली आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल याबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत.

भारतीय संघात होणारे चार बदल कोणते?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय संघात चार बदल होऊ शकतात. आता कोणते चार बदल होतील हा प्रश्न आहे. दोन बदल तर निश्चित मानले जात आहेत. पायाच्या दुखापतीमुळं बाहेर झालेला रिषभ पंत आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या जागी इतर दोन खेळाडूंना संधी मिळेल. तर उर्वरित दोन खेळाडू कोण असतील याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

रिपोर्ट्सनुसार, रिषभ पंतच्या जागी ध्रुव जुरेल खेळण्याची शक्यता दाट आहे. जुरेलला संधी मिळणे जवळपास निश्चित मानले जात आहे. दुसरीकडे, जसप्रीत बुमराहच्या जागी वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला संधी मिळू शकते. तसं झालं तर त्याला आंतरराष्ट्रीय कसोटी संघात पदार्पणाची संधी मिळेल. तो भारतीय कसोटी संघाची कॅप मिळवणारा ३१९ वा खेळाडू ठरेल.

आकाश दीप आणि कुलदीप यादवला मिळू शकते संधी

मिळालेल्या माहितीनुसार, जसप्रीत बुमराह संघाबाहेर झाल्यास गोलंदाजी कमकुवत होणार असे मानले जाते. पण त्याच्या जागी आता आकाश दीपला संधी दिली जाऊ शकते. आकाश दीपला दुखापतीमुळं मँचेस्टर कसोटीत खेळण्याची संधी मिळाली नव्हती. जर आकाश दीपचा संघात समावेश केला तर, अंशुल कंबोजला प्लेइंग ११ मधून बाहेर पडावे लागणार आहे.

ओव्हल कसोटीत स्पेशालिस्ट फिरकीपटू कुलदीप यादवला संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. नेटमध्ये तो सराव करताना दिसत आहे. सराव सत्रात प्रशिक्षक गौतम गंभीर त्याच्याशी वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करताना दिसत होता. कुलदीप यादव प्लेइंग इलेव्हनमध्ये आलाच तर, अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरला संघाबाहेर जावे लागेल.

भारतीय संघात होणार मोठे बदल, प्लेइंग इलेव्हन कशी असेल? कोणत्या ४ खेळाडूंना मिळणार संधी?
Ind Vs Eng Oval Test : इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत टीम इंडियात होणार मोठे बदल, जसप्रीत बुमराह खेळणार?

ओव्हल कसोटीत भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

शुभमन गिल हा कर्णधार असणार आहे. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल हे सलामीला येतील. साई सुदर्शन संघात कायम असेल. ध्रुव जुरेल हा रिषभ पंतची जागा घेईल. चौथ्या कसोटीत जिगरबाज फलंदाजी करून पराभवाची नामुष्की टाळणारा रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर हा संघात असेल. कुलदीप यादवची एन्ट्री होईल. मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि अर्शदीप सिंग हे वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळताना दिसतील.

भारतीय संघात होणार मोठे बदल, प्लेइंग इलेव्हन कशी असेल? कोणत्या ४ खेळाडूंना मिळणार संधी?
Gautam Gambhir massive fight : कसोटीआधीच ओव्हलच्या मैदानात राडा; गौतम गंभीर ब्रिटिशांना भिडला, VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com