Gautam Gambhir massive fight : कसोटीआधीच ओव्हलच्या मैदानात राडा; गौतम गंभीर ब्रिटिशांना भिडला, VIDEO

gautam gambhir clash oval curator video: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना निर्णायक होणार आहे. ओव्हलच्या मैदानात दोन्ही संघांचे खेळाडू भिडणार आहेत, पण त्यापूर्वीच ओव्हलच्या मैदानाच टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरच ब्रिटिशांना नडला आहे. खेळपट्टीवरून त्यांच्यात राडा झालाय. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
ओव्हलच्या मैदानात गौतम गंभीरचा राडा, पीच क्यूरेटरला भिडला, व्हिडिओ व्हायरल
Gautam Gambhir fights with Oval Pitch curator lee fortisPTI /x
Published On
Summary
  • ओव्हल कसोटीपूर्वी गौतम गंभीर आणि ग्राउंड क्यूरेटरमध्ये जोरदार बाचाबाची

  • खेळपट्टीच्या स्थितीवरून गौतम गंभीरने व्यक्त केली नाराजी

  • ली फोर्टिसला थेट सुनावलं, हातवारे करत राग काढला

  • गौतम गंभीर आणि फोर्टिसचा ओव्हल मैदानातला व्हिडिओ व्हायरल

भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये मैदानात स्लेजिंग, शाब्दिक चकमकी या काही नव्या नाहीत. अटातटी निर्माण झाली की दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये ठणाठणी होते. पाचवा कसोटी सामना तर हायव्होल्टेज होणार आहे यात शंकाच नाही, पण त्यापूर्वीच ओव्हलच्या मैदानात राडा झालाय. पण या राड्यांमध्ये कुणी खेळाडू नाही तर, टीम इंडियाचा प्रशिक्षक गौतम गंभीरच उतरलाय. गंभीर थेट ओव्हल क्रिकेट ग्राउंडचा चीफ क्यूरेटर ली फोर्टिसला नडलाय.

गौतम गंभीर आणि ओव्हल क्रिकेट ग्राउंडचा चीफ क्यूरेटर ली फोर्टिस यांच्यात बुधवारी जोरदार बाचाबाची झाली. पाचव्या आणि निर्णायक कसोटी सामन्याआधीच ओव्हलचं वातावरण तापलं. ओव्हलच्याच मैदानात येत्या गुरुवारपासून (३१ जुलै) कसोटी सामना होणार आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, गंभीरनं खेळपट्टीवरून तीव्र नाराजी व्यक्त केली. मैदानात जात त्यानं थेट क्यूरेटरलाच प्रश्न विचारला. दोघांमध्ये खेळपट्टीवरून बाचाबाची झाली.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. या मालिकेत इंग्लंड सध्या २-१ ने आघाडीवर आहे. अखेरचा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याची नामी संधी भारताकडे आहे. अशावेळी कोणत्याही प्रकारची अनिश्चितता आणि खेळपट्टीशी संबंधित अडचण टीम इंडियाच्या व्यवस्थापनाला नकोय. आता सर्वांच्या नजरा या ओव्हलच्या कसोटीकडे लागल्या आहेत. आता खेळपट्टी नेमकी फलंदाजीला पोषक आहे की गोलंदाजीला हे बघणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

ओव्हलच्या मैदानात गौतम गंभीरचा राडा, पीच क्यूरेटरला भिडला, व्हिडिओ व्हायरल
Asia Cup 2025 schedule : भारत-पाकिस्तान भिडणार, तारीख ठरली! आशिया चषक स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

गंभीर आणि क्यूरेटरमध्ये नेमकं काय घडलं?

सूत्रांच्या माहितीनुसार, गौतम गंभीर आणि ओव्हल मैदानाचे मुख्य क्यूरेटर ली फोर्टिस यांच्यात गुरुवारी जोरदार शाब्दिक चकमक झडली. याच मैदानात पाचवा निर्णायक कसोटी सामना होणार आहे. तुम्ही फक्त इथे ग्राउंड मॅन आहात, असं गंभीर फोर्टिसला म्हणाला. खेळाडू ज्यावेळी रनअप एरियात होते, त्यावेळी ही बाचाबाची झाली. त्यानंतर फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटकने मध्यस्थी करत क्यूरेटरला सोबत घेऊन गेला. त्याच्याशी चर्चा केली. पण आक्रमक झालेला गंभीर अजूनही सीरीयस होता. दूरवरूनच तो हातवारे करत क्यूरेटरला सुनावत होता.

ओव्हलच्या मैदानात गौतम गंभीरचा राडा, पीच क्यूरेटरला भिडला, व्हिडिओ व्हायरल
Ind Vs Eng Oval Test : इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत टीम इंडियात होणार मोठे बदल, जसप्रीत बुमराह खेळणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com