Nitish Kumar Reddy
Nitish Kumar Reddysaam tv

Ind vs Eng: एक ओव्हर, दोघे गारद; भारताच्या नितीशकुमार रेड्डीचा इंग्लंडला जोरदार दणका

Nitish Kumar Reddy: सध्या इंग्लंडमध्ये एंडरसन-तेंडुलकर ट्रॉफी खेळवण्यात येतेय. या सिरीजमधील तिसरा सामना आजपासून लॉर्ड्सच्या मैदानावर सुरु झाला आहे. या सामन्यात नितीश कुमार रेड्डीने एकाच ओव्हरमध्ये २ विकेट्स काढत इंग्लंडला चांगलाच दणका दिला आहे.
Published on

सध्या भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यामध्ये तिसरा टेस्ट सामना खेळवण्यात येतोय. लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या या सामन्यात नितीश कुमार रेड्डीच्या गोलंदाजीची जादू दिसून आली आहे. यावेळी सामना सुरु होऊन जवळपास दीड तास भारताला विकेट मिळत नव्हती. मात्र नितीशने त्याच्या पहिल्यात ओव्हरमध्ये २ विकेट्स काढल्यात.

कर्णधार शुभमन गिलने १४ वी ओव्हर नितीशला टाकण्यास दिली. यावेळी नितीशची ही या सामन्यातील पहिली ओव्हर होती. या ओव्हरमध्ये इंग्लंडच्या दोन्ही ओपनर फलंदाजांना त्याने पव्हेलियनमध्ये पाठवलं आहे.

Nitish Kumar Reddy
Ind Vs Eng : कृष्णा आउट, बुमराह इन! लॉर्ड्स कसोटीसाठी टीम इंडियामध्ये फक्त १ बदल

पहिल्याच ओव्हरमध्ये २ विकेट्स

नितीशच्या या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर एकही रन निघाला नाही. तर दुसऱ्या बॉलवर बेन डकेटने फोर लगावला. तर तिसऱ्या बॉलवर नितीशने त्याला माघारी पाठवलं. ऋषभ पंतच्या हातात कॅच देऊन तो आऊट झाला. तर याच ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवर झॅक क्रॉल देखील १८ रन्सवर बाद झाला.

Nitish Kumar Reddy
IND vs ENG Lord's Test: कोण जिंकणार तिसरी टेस्ट? लॉर्ड्सवर कोणाचं पारडं जड? पाहा आकडे काय सांगतात!

दुसऱ्या टेस्टमध्ये नीतीशची खराब कामगिरी

एजबॅस्टन टेस्टमग्ये नितीश रेड्डीला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. यावेळी त्याला केवळ २ रन्स करू शकला. त्याने पहिल्या डावात एक आणि दुसऱ्या डावात एक रन काढला. एजबॅस्टनमध्ये त्याला फक्त ६ ओव्हर टाकण्याची संधी मिळाली. दुसऱ्या डावात त्याला गोलंदाजी दिली नाही. पण टीम इंडियाने लॉर्ड्समध्ये रणनीती बदलली आणि नितीश रेड्डीला फक्त १३ ओव्हर्सचा जुना बॉल दिला आणि त्याने आपल्या स्विंगने इंग्लंडला दोन मोठे धक्के दिले.

इंग्लंडने जिंकला टॉस

या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानुसार भारत प्रथम गोलंदाजी करण्यासाठी उतरला आहे. भारतीय टीममध्ये फक्त एकच बदल आहे. प्रसिद्ध कृष्णाच्या जागी जसप्रीत बुमराह लॉर्ड्स टेस्टमध्ये परतला आहे. तर इंग्लंडच्या टीममध्येही जोफ्रा आर्चरचं कमबॅक झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com