
Ind Vs Eng 3rd Test : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील तिसरा सामना सुरु झाला आहे. लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड हे दोन संघ आमने-सामने आले आहेत. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारताचा संघ प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. टॉसनंतर भारताच्या ११ शिलेदारांची घोषणा करण्यात आली.
भारताची प्लेईंग ११ -
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, करुण नायर, शुभमन गिल (कर्णधार), रिषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप
इंग्लंडची प्लेईंग ११ -
झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रुट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, ब्रेडन कार्स, जोफ्रा आर्चर, शोएब बशीर
लॉर्ड्सच्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने जोश टंगच्या जागी जोफ्रा आर्चरला संघात स्थान दिले. दुसऱ्या बाजूला, प्रसिद्ध कृष्णाऐवजी जसप्रीत बुमराहला भारताच्या प्लेईंग ११ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. दोन्ही संघांनी प्लेईंग ११ मध्ये फक्त १ बदल केले आहेत. लॉर्ड्स स्टेडियमची खेळपट्टी वेगवान गोलदाजांसाठी परिपक्क असल्याने दोन्ही संघांकडून वेगवान गोलंदाजांना संघात समाविष्ट करण्यात आले आहेत.
भारत आणि इंग्लंड हे संघ लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर आत्तापर्यंत १९ सामने खेळले आहेत. यातील ३ सामन्यांमध्ये भारताचा विजय झाला आहे. १२ सामने भारताने गमावले आहेत. याशिवाय ४ सामने अनिर्णित म्हणजेच ड्रॉ झाले आहेत. आकडेवारीनुसार, भारताचा लॉर्ड्सवर संघ काहीसा मागे आहे. पण एजबॅस्टन कसोटी जिंकल्यानंतर सध्याचा भारताचा संघ लॉर्ड्सवर चांगली कामगिरी करेल असा विश्वास चाहत्यांना आहे.
कसोटी मालिकेमध्ये सध्या भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ बरोबरीवर आहेत. पहिला लीड्स कसोटी सामना इंग्लंडने जिंकला आहे, तर दुसऱ्या एजबॅस्टन कसोटी सामन्यामध्ये भारताने विजय मिळवला. आता मालिकेमध्ये आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघांनी लॉर्ड्सचे मैदान मारणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.